विवो लवकरच आपल्या V सीरीजचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या महिन्यात Vivo V25 सीरीज सर्वांसमोर आणू शकते. Vivo V23 सीरीज या वर्षी लॉन्च करण्यात आली आणि आता पुढील Vivo V25 सीरीजचे स्पेसिफिकेशन आणि लॉंच डेटबद्दल माहिती लीक झाली आहे.
TechYorker च्या रिपोर्टनुसार, चीनी स्मार्टफोन निर्माता येत्या काही आठवड्यांमध्ये भारतात V25 आणि V25 Pro स्मार्टफोन्स रिलीज करण्याचे प्लॅन आखत आहे. Vivo चा हा फोन जुलै-मिडमध्ये लॉंच होऊ शकतो. नवीन Vivo स्मार्टफोन्स कंपनीचे प्रीमियम स्मार्टफोन असतील आणि त्यांची किंमत ३०,००० ते ४०,००० रुपये असू शकते. या सर्व बातम्या लीकवर आधारित आहेत आणि कंपनीने अद्याप लॉंचबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
आणखी वाचा : २ हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Nokia, Motorola चे बेस्ट स्मार्टफोन, टॉप ५ ऑप्शन पाहा
नवीन रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Vivo V25 Pro तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हा Vivo फोन ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज, ८ GB रॅम २५६ GB स्टोरेज आणि १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉंच केला जाऊ शकतो. याशिवाय, डिव्हाइसमध्ये ६.५६ इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो, ज्याचे रिझोल्यूशन फुलएचडी + आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz असू शकतो. हँडसेटच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असल्याच्या बातम्या आहेत. Vivo V25 Pro मध्ये ५० मेगापिक्सेल Sony IMX766V प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा असू शकतो.
आणखी वाचा : मोठ्या बॅटरीसह भेटीला येतोय Tecno Pova 3 ‘पॉवरहाऊस स्मार्टफोन’, जाणून घ्या फीचर्स
Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असू शकतो. प्रो व्हेरिएंटमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर असू शकतो. हँडसेटमध्ये ४५०० mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी ८० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Qualcomm Snapdragon ७७८ G प्रोसेसर किंवा Dimensity १२०० प्रोसेसर बेस व्हेरिएंटमध्ये असू शकतो. ४५०० mAh बॅटरीसह फोनमध्ये ४४ W किंवा ६६ W फास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते. डिव्हाइसमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. फोनमधील रियर कॅमेरा मॉड्यूल प्रो वेरिएंट सारखाच असल्याच्या बातम्या आहेत.