Vodafone Idea Best Recharge Plans: Vodafone Idea कंपन्यांचे Prepaid, Postpaid, डेटा प्लॅन ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी देशात अनेक इंटरनेट प्लॅन लाँच करत असतात. विशेष म्हणजे, Vodafone Idea कडे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींच्या श्रेणींमध्ये वेगवेगळ्या फायद्यांसह येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला या टेलीकॉम कंपन्यांच्‍या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत जे तुम्‍हाला जास्तीत जास्त बेनेफिट्स देण्‍यासोबतच अतिशय स्वस्तात मिळतात. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दैनंदिन डेटा आणि ४८ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटासह ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन यांसारखे फायदे मिळतील. चला, व्होडाफोन आयडियाच्या अतिरिक्त डेटासह प्लॅनबद्दल जाणून घेऊया…

व्होडाफोन आयडियाचा ६०१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्रीपेड प्लॅनची ​​वेळ मर्यादा २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज ३ जीबी डेटासोबत १६ जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅनसह १ वर्षासाठी दिले जात आहे. याशिवाय लाइव्ह टीव्ही, मूव्ही, बिंज ऑल नाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जात आहे.

(आणखी वाचा : जबरदस्त ऑफर! फक्त २० हजाराच घरी आणा iPhone 11; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्होडाफोन आयडियाचा ९०१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनी या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर करते. यासोबतच ४८ जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. याशिवाय प्रीपेड प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन आणि लाइव्ह टीव्हीचा अॅक्सेस एक वर्षासाठी दिला जात आहे. त्याच वेळी, Vi च्या या डेटा प्लानची वैधता ७० दिवसांची आहे.