स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण फोनचा वापर करत असल्याचे पाहायला मिळते. ऑफिसच्या कामामध्येही स्मार्टफोनचा वापर होत आहे. करोना काळापासून स्मार्टफोन्स वापरण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फोन वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनावश्यक Ads चा त्रास होत असतो. काही वेळेस काम सुरु असताना, गेम खेळताना किंवा व्हिडीओ पाहताना अ‍ॅड्स येतात. अशा वेळी खूप चिडचिड होत असते. अ‍ॅड्समुळे होणारा त्रास नाहीसा व्हावा यासाठी या अ‍ॅड्स ब्लॉक करव्या लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅड्स किंवा जाहिराती हे आपण गुगलवर काय सर्च करतो यावरुन ठरत असते. आपल्या गुगल सर्चनुसार स्मार्टफोनवर अ‍ॅड्स येत असतात. उदा. जर तुम्ही गुगलवर एखादी रेसिपी सर्च केली तर थोड्या वेळात त्या पदार्थाशी संबंधित किंवा रेसिपीशी संबंधित जाहिराती फोनवर यायला लागतात. स्मार्टफोनमधील काही सेटिंग्स बदलून आपण Ads पासून सुटका मिळवू शकतो.

Ads ब्लॉक करण्यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये करावेत हे बदल –

  • फोनमधील Setting मध्ये जा आणि त्यातील Manage your google account हे ऑप्शन निवडा.
  • पुढे त्यातील Ads (Advertisement) हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
  • स्मार्टफोन्समध्ये Ads ऐवजी Google Ads किंवा Ads Settings असे पर्याय असतात.
  • त्यामधील Ad Settings मध्ये जावे. तेथे Opt out of personalized ads किंवा Turn off interest-based ads यावर क्लिक करावे.
  • काही स्मार्टफोन्समध्ये Reset Advertising ID किंवा Reset Ad ID असे ऑप्शन्स दिसतील. हे ऑप्शन्स निवडावे.

Netflix चा मोठा निर्णय! कंपनीने पासवर्ड शेअर करण्यावर घातली बंदी, अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी भरावे लागतील जास्तीचे पैसे

स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये हे सोपे बदल केल्याने सतत पॉप अप होणाऱ्या अनावश्यक जाहिराती फोनवर दिसत नाहीत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to block ads permanently from android smartphone then follow this simple tricks know more yps
First published on: 25-05-2023 at 13:10 IST