Westinghouse हा एक अमेरिकन इलेट्रॉनिक्स ब्रँड आहे. तसेच हा ब्रँड त्याच्या नवीनतम ऑफरसह टेलिव्हिजन मार्केटमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. सध्या आघाडीची असलेली ई-कॉमर्स वेबसाईट Amazon च्या मदतीने Westinghouse टीव्ही लाइनअपमध्ये नवीन टीव्ही जोडत आहेत. तर कंपनी W2 सिरीजमध्ये ३२ इंचाचे रेडी, ४३ इंचाचे फुल एचडी आणि ४० इंचाचे फुल एचडी मॉडेलचा समावेश आहे. तर Quantum सिरीजमध्ये ५० इंच आणि ५५ इंचाच्या 4K मॉडेलचा समावेश आहे. ज्याची किंमत १०,४९९ रुपये आहे. अर्ली बर्ड सेल दरम्यान देखील डिस्काऊंटचा लाभ ग्राहक घेऊ शकतात जो १४ ते १६ जुलै २०२३ दरम्यान होणार आहे.
वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचे COO जेम्स लुईस म्हणाले, ” आम्ही भारतीय बाजारामध्ये टीव्हीच्या विस्ताराबद्दल कमालीचे उत्साहित आहोत. एक शक्तिशाली इतिहास असलेला एक प्रसिद्ध ब्रँडच्या रूपात वेस्टिंगहाऊस भारतीय ग्राहकांना अपवादात्मक टेलिव्हिजन अनुभव देण्यासाठी तयार आहे.” याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
Realtek टेक्नॉलॉजीसह सर्व नवीन वेस्टिंगहाऊस ३२, ४० आणि ४३ इंचाचा एचडी अँड्रॉइड टीव्ही त्यांच्या प्रगत स्पीकर सिस्टिमसह चांगला ऑडीओचा अनुभव ग्राहकांना देतात. २ ३६W बॉक्स स्पिकरने सुसज्ज असलेले हे मॉडेल चांगलय प्रकारची आवाज गुणवत्ता प्रदान करतो. सराउंड साउंड टेक्नॉलॉजी पाहण्याचा अनुभव अजून चान्गला बनवते. ज्यामुळे दर्शकांना त्यांच्या आवडत्या चित्रपट आणि शोमध्ये पूर्णपणे मग्न झाल्यासारखे वाटते. हे टीव्ही १ जीबी रॅम आणि ८ जीबी रॉम, बेझल लेस डिझाईन आणि अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टिमसह येतात.
याशिवाय टीव्ही ३ HDMI आणि २ यूएसबी पोर्टसह येतात. ज्यामुळे लॅपटॉप, मोबाइल डिव्हाइस आणि पीसीला कनेक्टिव्हीटी मिळते. YouTube रिमोटवर समर्पित शॉर्टकट की वापरून Amazon Video, Zee5, Sony LIV आणि Voot सारख्या लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणे सोपे झाले आहे.
मोठ्या आकाराचे डिस्प्ले आणि फीचर्स शोधणाऱ्या Westinghouse च्या ५० आणि ५५ इंचाच्या Google टीव्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे २७,९९९ आणि ३२,९९९ रुपये आहे. हे टीव्ही २ जीबी रॅम आणि १६ जीबी रॉमसह येतात. हे टीव्ही MT9062 प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. आवाजाच्या बाबतीमध्ये हे टीव्ही DTS TruSurround टेक्नॉलॉजीचे २ ४८ W डॉल्बी ऑडिओ स्टिरीओ बॉक्स स्पीकरसह सुसज्ज आहेत. टीव्हीमध्ये बेझल-लेस आणि एअर-स्लिम डिझाइन, ब्लूटूथ आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी, व्हॉइस-सक्षम रिमोट आणि विविध उपकरणांसह अखंड कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI आणि 2 USB पोर्ट देखील आहेत.
सुपर प्लास्ट्रोनिक्स प्रा.लि.चे व्ही.पी पल्लवी सिंग मारवाह यांनी सांगितले, ”आम्ही पाच नवीन वेस्टिंगहाऊस टीव्ही मॉडेलच्या अनावरणाची घोषणा करताना आनंदित झालो आहोत. ज्यात Google TV आणि Android TV यांचा समावेश आहे. ही उल्लेखनीय लाइनअप Amazon सोबतच्या आमच्या सहकार्याचा परिणाम आहे . या अत्याधुनिक टेलिव्हिजनचे प्रदर्शन करण्यास अधिक उत्सुक आहोत. ”