युएसबीचा वापर करताना अनेकजण करताना दिसतात, आपणही अनेकदा युएसबीचा वापर करतो. पण युएसबीचा फुल फॉर्म काय? त्याचे किती प्रकार आहेत? त्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचा वापर कशासाठी केला जातो, याबाबत अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात. याचे प्रकार आणि त्यांचा उपयोग जाणून घ्या.

‘युनिवर्सल सीरिअल बस’ हा ‘युएसबी’चा फुल फॉर्म आहे. युएसबी कनेक्शन स्टॅंडडर्ड कनेक्शन टाइपसाठी वापरले जाते. याचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांचा उपयोग कशासाठी होतो जाणून घ्या.

युएसबी ए
हा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. आपल्या मोबाईल फोनच्या चार्जिंगमध्येही हा प्रकार वापरण्यात येतो. लॅपटॉप, कॉम्पुटर, पेन ड्राइव्ह यांमध्ये ‘युएसबी ए’ प्रकाराचा वापर केला जातो. रिसिव्हर डिव्हाइसेसमध्ये याचा वापर केला जातो.

युएसबी बी
या प्रकारातील युएसबीचा आकार लहान आणि चौकोनी असतो. स्कॅनर्स, प्रिंटर्समध्ये याचा वापर केला जातो. फ्लॉपी ड्रायव, ऑप्टिकल ड्राईव्ह, हार्ड ड्राइव्ह आणि इतर एक्सटर्नल डिवाइसेसमध्ये ‘युएसबी बी’ प्रकार वापरला जातो.

युएसबी सी
युएसबी सी फास्टेस्ट कनेक्टर म्हणून ओळखले जाते. हा रिवर्सेबल कनेक्टर आहे, म्हणजे याचा विरुद्ध दिशेनेही वापर करता येतो. स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अशा डिवाइसेसमध्ये या प्रकारचा वापर केला जातो.

मिनि युएसबी
युएसबी ए आणि बी प्रकारचे ‘मिनि युएसबी’ लहान वर्जन आहे. लहान डिवाइसमध्ये याचा वापर केला जातो. गेम कंट्रोलर्स, मोबाईल, पोर्टेबल कॅमेरा यांमध्ये याचा वापर केला जातो. यामध्ये ४,५ पिन्स उपलब्ध असतात.

मायक्रो युएसबी
मायक्रो युएसबी देखील ए आणि बी प्रकारचे वर्जन आहे. हे देखील डिवाईसमधील जागेची बचत करण्यासाठी वापरले जाते. हे युइसबी २.० आणि युएसबी ३.० या दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असते. टॅबलेट्स, गेम कंट्रोलर, स्मार्टफोन यामध्ये याचा वापर केला जातो.