WhatsApp Update : मेटा मालकीच्या व्हॉट्सऍपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये दुप्पट सदस्य जोडू शकता. नवीन अपडेटमध्ये ५१२ समस्यांना जोडण्याची अनुमती असेल. सध्या ही मर्यादा २५६ सदस्यांपर्यंत कार्यरत आहे. डब्लूएबीटाइन्फोच्या अहवालानुसार, मेटा मालकीने हे वैशिष्ट्य व्हॉट्सऍपच्या अँड्रॉइड , आयओएस आणि डेक्सटॉप आधारित ॲप्सच्या बीटा आवृत्तीवर आणले आहे. एका ग्रुपमध्ये ५१२ पर्यंत सदस्य जोडण्याची क्षमता हे एकमेव अपडेट नाही तर अलीकडच्या काळात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अनेक अपडेट आणली आहेत. कंपनीने मेसेज रिएक्शन आणि एकावेळी २ जीबी पर्यंत फाइल शेअर करण्याची क्षमता यासारखी वैशिष्ट्ये देखील आणली आहेत. यापूर्वी, व्हॉट्सऍप वापरकर्ते फक्त १०० एमबी पर्यंत फाइल्स शेअर करू शकत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसे तपासाल ?

१) जर तुम्हाला ५१२ पर्यंत सदस्य जोडू शकण्याची , कार्यक्षमता प्राप्त झाली आहे का हे तपासायचे असल्यास , नवीन गट पर्यायावर टॅप करून नवीन गट तयार करण्याचा प्रयत्न करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp group limit reached 512 members check it out gps
First published on: 10-06-2022 at 18:05 IST