Republic Day 2023: व्हाट्सअँप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो कारण हे एक मेसेजिंग अ‍ॅप आहे. यावरून आपल्याला फोटोज, व्हिडीओ शेअर करणे , व्हॉईस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स देखील करता येतात.

कोणताही सण असो किंवा आनंदाचा दिवस असो आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. त्यांना व्हाट्सअँपचे स्टिकर्स आणि कोट्स डाउनलोड करण्यास आवडत असते. यावर्षी भारत २६ जानेवारी २०२३ रोजी आपला प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यावेळी व्हाट्सअँप वरून तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचे स्टिकर्स डाउनलोड कसे करायचे व आपल्या मित्रांना कसे पाठवायचे हे आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा : WhatsApp वरून पाठवता येणार ओरिजिनल क्वालिटीचे फोटोज; युजर्सना होणार फायदाच फायदा

Step-1. प्रथम Google play Store उघडा आणि प्रजासत्ताक दिन whatsapp stickers सर्च करा.

Step-2. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा स्टिकर पॅक निवडा आणि तो पॅक डाउनलोड करा.

Step-3. त्यानंतर कन्फर्म करून Add बटनावर क्लिक करा.

Step-4. ते Add केल्यानंतर व्हाट्सअँपवर जाऊन ज्यांना तुम्हाला पाठवायचे आहे ती चॅट विंडो उघडा.

Step-5. त्यानंतर स्टिकर्स सेक्शनमध्ये जाऊन add केलेल्या स्टिकर पॅकवर नेव्हीगेट करा.

Step-6. स्टिकर पाठवण्यासाठी कोणत्याही स्टिकरवर क्लिक करा आणि ज्यांना पाठवायचे आहे त्यांना स्टिकर सेंड करा.

हेही वाचा : Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा देत WhatsApp Status वर शेअर करा ‘ही’ खास ग्रीटिंग्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी व्हाट्सअँपवरून स्टिकर पाठवू शकता. व्हाट्सअँप हे मेटाच्या मालकीचे माध्यम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते.