WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. व्हाट्सअ‍ॅप असेच आणखी एक फिचर आपल्या वापरकर्त्यांसाठी घेऊन आले आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपने बीटा वापरकर्त्यांसाठी Kept Messages हे फिचर आणले आहे. व्हाट्सअ‍ॅपच्या अनेक फीचर्सबद्दल माहिती देणारी वेबसाईट WaBetaInfo च्या माहितीनुसार लोकप्रिय असणाऱ्या व्हाट्सअ‍ॅपने जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा केप्ट मेसेज या फीचरची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे फीचर रोल आऊट केल्यानंतर व्हाट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना डिस्पेअरिंग फीचरद्वारे चॅटिंग मेसेज ठराविक काळासाठी सेव्ह करू शकणार आहेत. तसेच यामध्ये चॅटिंग मधील मेसेज किती वेळानंतर डिलीट किंवा गायब होणार ते वापरकर्ते यामध्ये ठरवू शकणार आहेत.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये पुन्हा कमर्चाऱ्यांच्या कपातीची शक्यता, जाणून घ्या काय आहे कारण

WaBetaInfo च्या अहवालानुसारअँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या व्हाट्सअ‍ॅपच्या बीटा वापरकर्त्यांना लेटेस्ट अ‍ॅपवर हे 2.23.4.10 सह कॅप्चर केलेले केप्ट मेसेज हे फिचर मिळणार आहे. उपलब्ध पर्यायांमुळे WhatsApp वापरकर्ता ठराविक वेळेसाठी अन्य वापरकर्त्यासोबत मेसेज चॅट करू शकणार आहे. ठराविक वेळेनंतर हे मेसेज आपोआप चॅटबॉक्समधून डिलीट होतात.हे नवीन फीचर बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहे. व्हाट्सअ‍ॅप हे मेसेज फिचर भविष्यात अधिक वापरकर्त्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या व्हाट्सअ‍ॅपने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन फीचरचे अपडेट देण्यासाठी सुरुवात केली आहे. आयफोन वापरकर्त्यांना हे फीचरचे अपडेट कधीपर्यंत मिळेल याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Kept Messages असे करते काम

Kept Messages हे फीचर व्हाट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना गायब झालेल्या फीचरवर नियंत्रण ठेवण्याचा ऑप्शन देते. या मेसेज फिचरच्या मदतीने व्हाट्सअ‍ॅप वापरकर्ते चॅट्सना सेव्ह करू शकतात. सेव्ह केलेले चॅट्स या नवीन फीचरमुळे कोणीही पाहू शकतो. ते नेहमी चॅटबॉक्समध्ये दिसेल. केप्ट मेसेज या फिचर अंतर्गत सेव्ह केलेल्या चॅट्स अन-कीप करण्याचा पर्याय वापरकर्त्यांकडे असणार आहे. जसे वापरक्रते मेसेज अन कीप करतील तेव्हा मेसेज गायब होतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp introduced kept message feature which allows users to save messages tmb 01
First published on: 15-02-2023 at 12:12 IST