जगभरात व्हॉट्सअ‍ॅप  वापरणाऱ्यांची संख्या भरमसाठ असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता घरापासून ते ऑफिसला जाण्यापर्यंत कामासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे अ‍ॅप  ठरले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने अखेर ते फीचर आणले आहे, ज्याची लाखो वापरकर्ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

कंपनीने ‘Who can see when I am online’ असे आणलेल्या नवीन फीचरचे नाव आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमुळे वापरकर्ते अ‍ॅप वापरताना त्यांचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये दिलेल्या लास्ट सीन आणि ऑनलाइन ऑप्शनमध्ये वापरकर्त्यांना हा पर्याय मिळेल. WABetaInfo या व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट अपडेट्सचा ट्रॅक घेणाऱ्या वेबसाइटने या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

(आणखी वाचा : तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजवर असू शकते दुसऱ्याची नजर; त्वरीत चेक करा ‘हे’ फीचर )

ऑनलाइन स्टेटस कोण पाहू शकते हे ठरवता येणार
लास्ट सीन आणि ऑनलाइन पर्यायावर जाऊन वापरर्ते त्यांच्या ऑनलाइन स्टेटसची सेटिंग बदलू शकतात हे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. लास्ट सीन मध्ये वापरकर्त्यांना चार पर्याय मिळतील – Everyone, My Contacts, My Contact Except आणि Nobody. आता ऑनलाइन स्टेटससाठी, कंपनी Everyone आणि Same as last seen चा पर्याय देत आहे. Who can see my last seen हा पर्याय निवडून, तुमच्या ऑनलाइन असण्याबद्दल कोणाला माहिती मिळते आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीटा टेस्टर्ससाठी फिचर उपलब्ध आहे
व्हॉट्सअ‍ॅपअँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन २.२२.२०.९ मध्ये बीटा टेस्टर्स निवडण्यासाठी कंपनी सध्या हे फीचर देत आहे. WABetaInfo नुसार, काही बीटा टेस्टर्स २.२२.२०.७ बीटा बिल्डमध्ये देखील हे फिचर मिळू शकते. कंपनी यशस्वी बीटा टेस्टिंगनंतर जागतिक वापरकर्त्यांसाठी या फीचरची स्टेबल व्हर्जन आणेल अशी अपेक्षा आहे. सध्या, फीचरच्या अधिकृत स्थिर रोलआउट तारखेबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.