scorecardresearch

३० सेकंदाचा व्हॉइस मेसेज करायचाय? WhatsApp लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर, जाणून घ्या

Whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता.

whatsapp launch pip features
WhatsApp – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हाट्सअ‍ॅप हे मेटाच्या मालकीचे एक माध्यम आहे. यावर तुम्ही व्हिडीओ कॉलिंग, व्हॉइस कॉल्स आणि फोटो किंवा व्हिडीओ स्टेट्सला शेअर करू शकता. हे माध्यम आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. आतापर्यंत आपण व्हाट्सअ‍ॅप कॉलिंग, मेसेजला पिन करणे , लाईव्ह लोकेशन शेअर करणे असें फीचर्स बद्दल जाणूनघेतले आहे. व्हाट्सअ‍ॅप अजून एक फीचर्स आपल्या वापरकर्त्यांसाठी घेऊन येत आहे. हे फिचर काय आहे ते कसे वापरावे आणि त्याचा उपयोग काय आहे ते जाणून घेऊयात.

मेटाच्या मालकीचे व्हाट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांसाठी काही नवीन फीचर्स आणली आहेत. यावेळी व्हाट्सअ‍ॅपने स्टेटस संबंधित फिचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना स्वतःला व्यक्त करणे आणि इतरांशी कनेक्ट होणे सोपे जाते. व्हाट्सअ‍ॅप स्टेटस हे २४ तासांनी डिलीट होते. या फीचरमधून लोक त्यांचे फोटो , व्हिडीओ इत्यादी शेअर करू शकणार आहेत.

हेही वाचा :WhatsApp वरून पाठवता येणार ओरिजिनल क्वालिटीचे फोटोज; युजर्सना होणार फायदाच फायदा

व्हाट्सअ‍ॅपने सांगितले की, वापरकर्त्यानी शेअर केलेले स्टेटस सर्व कॉन्टॅक्टसाठीच असले पाहिजे हे आवश्यक नसते. व्हाट्सअ‍ॅप आता वापरकर्त्यांना त्यांच्या प्प्रायव्हसी सेटिंग अपडेट करण्याचा पर्याय देणार आहे. यामुळे आपले स्टेटस कोणाला दिसावे हे वापरकर्ते ठरवू शकणार आहेत.

व्हाट्सअ‍ॅपमध्ये याशिवाय आता ३० सेकंदापर्यंतचे व्हॉइस मेसेज रेकॉर्ड व्हाट्सअ‍ॅपवर शेअर करता येणार आहेत. व्हाट्सअ‍ॅपच्या म्हणण्यानुसार वापरकर्ते वैयक्तिक अपडेट देण्यासाठी व्हॉइस स्टेटसचा वापर करू शकणार आहेत. व्हाट्सअ‍ॅपचे वापरकर्ते त्यांच्या स्टेटसवर लोकांच्या रिप्लायची अपेक्षा करतात. तुम्हाला कोणाचा स्टेटस्वर रिप्लाय द्यायचा असेल तर ते आता सोपे होणार आहे. आता वर स्वाईप केले केले की ८ ईमोजी दिसणार आहेत. त्यापैकी कोणत्याही एका इमोजीवर टॅप करून तुम्ही रिप्लाय देऊ शकणार आहात.

हेही वाचा :WhatsApp ने आणले नवीन फिचर, कोणत्याही भाषेतील मजकूर होणार ट्रान्सलेट; जाणून घ्या

अनेक वेळेला आपण लोकांचे स्टेटस पाहू शकत नाही. मात्र आता तसे होणार नाही असे व्हाट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे. जेव्हा कोणी स्टेटस टाकेल तेव्हा त्याच्या प्रोफाईलवरवर एक रिंग दिसणार आहे. ज्यावरून तुम्हाला या व्यक्तीने स्टेटस ठेवले आहे हे समजण्यास मदत होणार आहे. व्हाट्सअ‍ॅपचे हे नवीन फिचर जगभरातील वापरकर्त्यांसाठी रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे प्रत्येकासाठी उपलब्ध केले जाणार आहे .

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 16:06 IST