व्हॉटसअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉटसअॅप वापरत नसतील अशा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये क्वचितच व्यक्ती असतील. सगळ्यांकडे उपलब्ध असल्यामुळे संवादाचे हे सोपे माध्यम आहे. मेसेज, कॉल, व्हिडिओ कॉल यासह फोटो, व्हिडिओ, फाईल्स शेअर करणे अशा अनेक सुविधा व्हॉटसअॅपवर उपलब्ध आहेत. यासह युजर्सना आकर्षित करण्यासाठी व्हॉटसअॅपकडुन सतत नवे फीचर्स रोल आऊट केले जातात. असेच एक नवे फीचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
‘व्हॉटसअॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉटसअॅप लवकरच एक नवे फीचर रोल आऊट करणार आहे, ज्याच्या माध्यमातून युजर्सना फोटो, व्हिडीओ अशा फॉरवर्ड करण्यात आलेल्या मीडिया फाइल्ससह पाठवण्यात आलेले कॅप्शन्स देखील फॉरवर्ड करता येणार आहेत.
आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग
सध्या फोटो किंवा व्हिडीओबरोबर पाठवण्यात आलेले कॅप्शन फॉरवर्ड करता येत नाहीत. तुम्ही जर फॉरवर्ड करण्यात आलेला फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट करुन फॉरवर्ड केला तर फक्त तो फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड होतो, त्यासह कॅप्शनमध्ये देण्यात आलेली माहिती किंवा टेक्स्ट मेसेज फॉरवर्ड होत नाही. पण व्हॉटसअॅपच्या या नव्या फीचरमुळे कॅप्शनसह मीडिया फाइल्स फॉरवर्ड करता येतील, यामुळे प्रत्येक वेळी मेसेज फॉरवर्ड करताना त्याच्या बरोबरचा कंटेन्ट सतत कॉपी पेस्ट करावा लागणार नाही.
सध्या या फीचरवर काम सुरू आहे आणि लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या फीचरमुळे युजर्स ना कंटेन्ट फॉरवर्ड करणे अधिक सोपे होईल. फोटो, व्हिडीओ, जीआयएफ अशा फाइल्स फॉरवर्ड करताना त्याबरोबरचा टेक्स्ट मेसेजही सहजरित्या फॉरवर्ड करता येईल.