घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे (WhatsApp) अनेक कामं करणे शक्य होतात, त्यामुळे मेटा कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी नेहमी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असतात. तर व्हॉट्सअ‍ॅप आता भारतीय वापरकर्त्यांसाठी यूपीआय (UPI) पेमेंटसारखी एक नवीन सुविधा देणार आहे. त्यामुळे यूपीआय, पेटीएम, गूगल पे आणि फोन पे सारख्या इतर यूपीआय ॲप्सशी व्हॉट्सअ‍ॅप स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स किंवा व्हॉट्सअ‍ॅप पे लवकरच युजर्सना इतर यूपीआय ॲप्सप्रमाणे आंतरराष्ट्रीय पेमेंटची सुविधा देणार आहे.

ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा आवृत्तीला यूपीआय पेमेंटसाठी क्यूआर कोडचा शॉर्टकट मिळणार आहे, जो पुढील काही महिन्यांत मेसेजिंग ॲपवरील प्रत्येकासाठी रोल आउट केला जाऊ शकतो. सध्या ही सेवा सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही. पण, लवकरच व्हॉट्सअ‍ॅप भारतीय युजर्सना आंतरराष्ट्रीय यूपीआय पेमेंटची सुविधा देईल.

आगामी फीचर्सचे तपशील या आठवड्यात WeBetaInfo द्वारे सांगण्यात आले आहेत, ज्याने मेसेजिंग ॲपचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे आणि चॅट स्क्रीनवर क्यूआर कोड स्कॅनर वापरकर्त्यांना कसं देण्यात येईल हे दाखवलं आहे. यूपीआय क्यूआर कोड स्कॅनिंग फीचर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या थेट चॅट लिस्टमध्ये दिसेल. त्यामुळे यापुढे वापरकर्त्यांना पेमेंट करण्यासाठी अनेक स्टेप्स फॉलो करण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा…‘गूगल पे’ ची मूळ कल्पना कुणाची ? भारतात ऑनलाईन पेमेंटची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या…

Tipster @AssembleDebug ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप आंतरराष्ट्रीय पेमेंट सेवा सुरू करणार आहे; जी भारतीय युजर्सना आंतरराष्ट्रीय UPI पेमेंट सुविधा व खास AI वैशिष्ट्ये फीचर्सदेखील प्रदान करेल. तुम्हाला टॅबवर मुख्य चॅट स्क्रीनवर यूपीआयचा क्यूआर कोड स्कॅनर दिसेल, जेथे व्हॉट्सअ‍ॅपचा कॅमेरा आणि सर्च चिन्ह असते .

यूपीआय हे देशातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धतींपैकी एक आहे. देशातील अनेक युजर्स पेमेंटसाठी गूगल पे आणि फोन पे वर अवलंबून असतात. तर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधीपासूनच ४०० मिलीयन वापरकर्ते आहेत आणि त्यात यूपीआयच्या या शॉर्टकटमुळे वापरकर्त्यांमध्ये यूपीआय हा अ‍ॅप अधिक लोकप्रिय होऊ शकणार आहे.