चोरीच्या अनेक घटना दररोज घट असतात. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी अशा घटना सर्रास घडताना दिसतात. त्यामुळे गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू, पैशांच्या पाकिट चोरट्यांपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले जाते. तरीही काही चोर इतके हुशार असतात की, ते तुमच्या नकळत तुमच्या बॅगमधून पैशांचे पाकीट चोरुन कधी पळ काढतात हे तुम्हालाही कळत नाही. सध्या सोशल मीडियावर चोरीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक काकी इतक्या हुशारीने चोरी करतात की जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात एक महिला तिच्या पतीसह वस्तू खरेदी करण्यासाठी उभे आहे, तेवढ्यात तिथे एक दुसरी महिला तिथे येते आणि येताच हुशारीने ती तिथे आधीच उपस्थित असलेल्या महिलेच्या पर्सची चेन उघडते. यानंतर ती दुकानदाराला काही सामान आणायला सांगते. दुकानदार तिने सांगितलेली वस्तू आणून देत नाही तोवर ती चोर महिला अगदी सफाईदारपणे दुसऱ्या महिलेच्या बॅगमधून पैशांचे पाकीट काढते. यानंतर ती दुकानातून निघून जाते. महिलेने इतक्या हुशारीने चोरी केली की, पाहणारेही थक्क झाले.

cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Animal fight video deer trap between crocodile vs lion Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! इकडे मगर, तिकडे सिंह; हरणानं स्वतःला कसं वाचवलं? पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर theindiansarcasm नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, काकी एकदम प्रोफेशनल चोर दिसतायत. दुसऱ्या युजरने लिहिले – काकी तर एकदम प्रो निघाल्या. तिसऱ्या यूजरने लिहिले, अशी चोरी करताना लाज वाटली पाहिजे.