शाओमी (Xiaomi) ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉंच करीत असते. Xiaomi ने नुकतेच त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक नवीन टीझर शेअर केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ॲपल आयपॅड लाँच झाल्यानंतर लगेचच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यानंतर कंपनीला व्यावसायिकांची माफी मागावी लागली. जाहिरातीमध्ये पियानो, कॅमेरा आणि पेंटचे कॅन, औद्योगिक क्रशरने नष्ट केले आहेत, असे दाखवले आणि जाहिरातीच्या शेवटी तुम्हाला iPad Pro दिसेल. हे पाहून बरेच लोक नाराज झाले.

पण, कंपनीचा नवीन Xiaomi टीझर नवीन प्रॉडक्टबद्दल जास्त काही सांगत नाही. पण, एक नवीन ‘सिनेमॅटिक व्हिजन’ घेऊन येणार आहे हे मात्र कळते आहे. त्यामुळे प्रत्येक जण असा अंदाज लावत आहे की, Xiaomi भारतात पहिला सिव्ही फोन (Civi phone ) घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे Civi लाइनअप आतापर्यंत देशात सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कंपनीची Civi सीरिज पहिल्यांदा भारतीय बाजारात येईल.

Elon Musk on social media
अब्जाधीश असूनही एलॉन मस्कच्या मुलांकडे बटनाचा मोबाइल; जगभरातील पालकांना दिला धोक्याचा इशारा
Safety begins at home Password sharing between Google account holders of the same family Members if you want to
गूगल अकाउंटचा पासवर्ड सतत विसरता? आता चिंता सोडा, कुटुंबातील सदस्यांबरोबर करा बिनधास्त शेअर
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Indian Origin Researcher Ankur Gupta new technology that charge laptop mobile in a minute & electric car in Ten minutes
फक्त एका मिनिटांत फुल चार्ज करा लॅपटॉप, मोबाइल; संशोधकांनी शोधलं नवीन तंत्रज्ञान, पाहा कसा करता येईल वापर
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा…विविध ॲप्स वापरा, एकाच वेळी असंख्य टॅब उघडा; AI फीचर्ससह गूगलचा ‘हा’ स्मार्टफोन अगदी सुरळीत चालणार, पाहा किंमत

व्हिडीओ नक्की बघा…

Xiaomi चा भारतातील पहिला-सीव्ही स्मार्टफोन –

Xiaomi 14 Civi रिब्रँडेड Civi 4 Pro स्मार्टफोनमध्ये १.५ के रिझोल्युशनसह ६.५५ इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करील. Xiaomi 14 Civi च्या डिस्प्लेमध्ये Civi 4 Pro चे एक हायलाइटदेखील असेल; जो तब्बल 3,000nits पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले 2160Hz PWM Dimming आणि कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस २ (Corning Gorilla Glass Victus 2) संरक्षणासह हा स्मार्टफोन ग्राहकांना देण्यात येईल.

स्टोरेज –

स्टोरेजबद्दल सांगायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट असेल; जो 12GB LPPDDR5x रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेजसह जोडण्यात आलेला आहे.

कॅमेरा –

एक नाही, दोन नाही तर या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात येणार आहेत. पहिला बॅक कॅमेरा १२ मेगापिक्सेल ओम्निव्हिजन OV13B10 अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि ५० मेगापिक्सेल 2X टेलिफोटो कॅमेरा, तर सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे.

बॅटरी व इतर फीचर्स –

Xiaomi 14 Civi ला 4,700mAh बॅटरी लाईफ दिली जाईल; जी Xiaomi 14 फ्लॅगशिपवर पाहिल्याप्रमाणे 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. Xiaomi 14 आणि 14 Ultra प्रमाणे, Xiaomi 14 Civi देखील Android 14-आधारित Xiaomi HyperOS वर चालण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. Xiaomi 14 Civi वरील काही इतर अपेक्षित फीचर्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IR ब्लास्टर सेन्सर, हाय-रेस ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर व डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट यांचा समावेश असणार आहे. त्यात ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूएटूथ व यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.