Xiaomi ही मोबाईल कंपनी आपली Redmi Note 12 ही सिरीज भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. Redmi Note हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सपैकी एक आहे. Redmi Note आज भारतात तीन स्मार्टफोन्स लाँच करेल अशी अपेक्षा आहे. रेडमी नोट १२ , रेडमी नोट १२ Pro आणि रेडमी नोट १२ Pro+ हे तीन स्मार्टफोन्स असून हे ५ जी असणारे रेडमी नोट सिरीजमधील पहिले स्मार्टफोन्स असतील.Xiaomi कंपनी स्मार्टफोन्सच्या लाँचिंगचे थेट प्रसारण हे त्यांच्या अधिकृत युट्यूब आणि इंस्टाग्राम हँडलवर करणार आहे.

Xiaomi 5G कनेक्टिव्हिटीसाठी जिओ सोबत भागीदारी करणार आहे. रेडमी नोट १२ सिरीज चीनमध्ये यापूर्वीच लाँच झाली आहे. Redmi Note 12 Pro+ हा स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा , १२०Hz डिस्प्ले आणि १२० वॅटचे फास्ट चार्जिंग अशी फीचर्स येतील.अनेक अहवालांच्या माहितीनुसार भारतात स्मार्टफोन्सच्या बाजारात घसरण झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका Xiaomi कंपनीला बसला आहे. मात्र रेडमी नोट १२ सिरीज कंपनीला बाजारात कमबॅक करण्यासाठी चालना देऊ शकते.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

हेही वाचा : २०२३ मध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवे फीचर्स येणार; जाणून घ्या काय आहे विशेष…

Redmi Note 12 – फिचर्स

चीनमध्ये रेडमी नोट १२ या सिरीजमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे.तसेच ३३ वॅट चे फास्ट चार्जिंग आणि १२० Hz चा डिस्प्ले येतो. रेडमी नोट १२ प्रो प्लस मध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा आणि १२० वॅट फास्ट चार्जिंग अशी फीचर्स येतात. रेडमी नोट १२ प्रो मध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ६७ वॅट इतका फास्ट चार्जर येतो.

Redmi Note 12 सिरीज ; लाँचिंगची वेळ

Redmi Note 12 सिरीजचा लाँचिंग दुपारी १२ वाजता सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या युट्युब चॅनेलवर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. आजच्या इव्हेंटमध्ये आज तीन स्मार्टफोन्स लाँच होणे अपेक्षित आहे.