Xiaomi ने Mi Smart Band 6 च्या किमतीत कपात केली आहे. आता तुम्हाला Xiaomi Mi Smart Band 6 स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Xiaomi Mi Smart Band 6 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झाला होता. Mi Band 7 चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण भारतात Mi Band 7 ऑगस्ट 2022 च्या आसपास उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Mi Smart Band 6 सध्या भारतात कमी किमतीत घेता येईल, त्याची किंमत आणि फीचर्सशी संबंधित डिटेल्स जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Xiaomi Mi Smart Band 6 Price

Xiaomi Mi Smart Band 6 भारतात ३,४९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला. आता कंपनीने या बँडच्या किमतीत ५०० रुपयांनी कपात केली आहे. म्हणजेच आता तुम्ही Mi Smart Band 6 २,९९९ मध्ये खरेदी करू शकता. हा कंपनीचा भारतातील सर्वात महागडा Mi स्मार्ट बँड आहे. मागील Mi Smart Band 5 च्या तुलनेत या बँडमध्ये अनेक अपग्रेड फीचर्स देण्यात आले होते.

आणखी वाचा : २ हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Nokia, Motorola चे बेस्ट स्मार्टफोन, टॉप ५ ऑप्शन पाहा

Xiaomi Mi Smart Band 6 Specifications

Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये १.५६ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो Mi Smart Band 5 पेक्षा ५० टक्के मोठा आहे. या फिटनेस बँडची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर दोन आठवडे चालेल, असा दावा कंपनीने केला होता. Xiaomi चा हा फिटनेस बँड 5ATM रेटिंगसह येतो, याचा अर्थ पोहताना किंवा पाण्यात व्यायाम करताना तो खराब होणार नाही. या बँडमध्ये अपडेटेड SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्ट बँडमध्ये ३० हून अधिक फिटनेस अॅक्टिव्हीटीचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

Mi Wear अॅप्लिकेशन फिटनेस बँडला सपोर्ट करते. याशिवाय यामध्ये ६ हून अधिक अॅक्टिव्हिटींसाठी ऑटो डिटेक्शन सपोर्टही उपलब्ध आहे. Mi Smart Band 7 बद्दल बोलायचं झालं तर, तो ऑगस्टमध्ये लॉन्च होईल. Mi Band 7 मध्ये १.६२ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याची पिक्सेल घनता 326 ppi आहे. कंपनीने या बँडमध्ये फुल-कलर ऑलवेज-ऑन AMOLED पॅनल दिले आहे. ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग व्यतिरिक्त ब्रिदिंग एक्सरसाइज आणि फीमेल सायकिल ट्रॅकिंग सारखे उत्तम फिचर्स आहेत. यामध्ये १२० स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi mi smart band 6 price cut in india know all about it prp
First published on: 13-06-2022 at 21:51 IST