Xiaomi reduce price of Mi 11 Lite : शाओमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने Mi 11 Lite च्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झाला होता. आपल्या दमदार फीचर्समुळे तो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र त्याची किंमत अधिक होती. आता मात्र हा फोन बचतीसह खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे.

कंपनीनने Mi 11 Lite च्या किंमतीमध्ये 10 हजार रुपयांची कपात केली आहे. एमआय ११ लाइट ८ जीबी आणि १२८ जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत एमआयच्या संकेतस्थळावर २५ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, किंमतीमध्ये कपात केल्याने हा फोन आता १५ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

Boult launches smart home audio devices first soundbars Bassbox X Series in India only 4999 rupees new sound system
फक्त पाच हजारांत घरी आणा Boult चा साउंडबार; टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइललाही करता येईल कनेक्ट
Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
JioCinema IPL Free
यापुढे IPL मोफत पाहता येणार? जिओ सिनेमाही आता नेटफ्लिक्स, प्राइमप्रमाणे सबस्क्रिप्शनच्या वाटेवर
WhatsApp without internet allowed to send photos and files on Other Users Similar to apps like ShareIt
विना इंटरनेट करा फोटो,व्हिडीओ शेअर; ‘या’ ॲपमध्ये मिळणार सोय

(“…त्यामुळे तुमचे Twitter फॉलोअर्स कमी होऊ शकतात”, एलॉन मस्क यांचं सूचक ट्वीट; नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण!)

फीचर्स

Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच फूल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले, स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ६ मिळत आहे. फोनचे फीचर्स वापरताना अडथळा येऊ नये यासाठी त्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर देण्यात आले असून त्यासह अड्रिनो ६१८ जीपीयू आणि ८ जी पर्यंत रॅम मिळते.

फोनमध्ये ट्रिपल लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६४ एमपी प्राईमरी कॅमेरा, ८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि ५ एमपी टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. कमी प्रकाशात छायाचित्र काढण्यासाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

(नेटफ्लिक्सच्या सह संस्थापकाने मस्क यांच्यासाठी काढले गौरोद्गार, ते धाडसी आणि सर्जनशील, पण त्यांना..)

स्मार्टफोनमध्ये टाइप सी पोर्ट मिळत असून फोनचे वजन केवळ १५७ ग्राम आहे. फोनमध्ये दीर्घकाळ काम करता येण्यासाठी ४ हजार २५० एमएएचची बॅटरी देण्यात आली जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.