News Flash

सर्वोच्च स्थानासाठी स्पर्धा, सर्वोत्तम स्मार्टफोनची !

काही आठवडय़ांपूर्वी सोनी कंपनीने एक्सपिरीआ झेड हे नवीन मॉडेल बाजारपेठेत आणले. खरे तर जानेवारी महिन्यांत पार पडलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये ते कंपनीतर्फे सादर करण्यात आले,

| April 12, 2013 01:08 am

काही आठवडय़ांपूर्वी सोनी कंपनीने एक्सपिरीआ झेड हे नवीन मॉडेल बाजारपेठेत आणले. खरे तर जानेवारी महिन्यांत पार पडलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये ते कंपनीतर्फे सादर करण्यात आले, त्याचवेळेस जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले होते. डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ ही त्याची दोन प्रमुख वैशिष्टय़े होती. त्यावेळेपासून जगभरात त्याची चर्चा सुरू होती. अखेरीस तीन आठवडय़ांपूर्वी तो बाजारपेठेत दाखल झाला. आता सर्वोच्च शिखरावर असलेल्या स्मार्टफोनमध्ये त्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पण त्याच बरोबर या शिखरावर आयफोन ५, सॅमसंग गॅलेक्सी एस४ आणि एचटीसी वन हेदेखील विराजमान आहेत. आता शिखरावरच्या त्या जागेसाठी तीव्र स्पर्धा आणि चुरस सुरू आहे. स्मार्टफोनमधील सर्वाधिक किंमतीच्या असलेल्या फोनच्या किंमतीही आता सामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. शिवाय बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या यांच्यासोबत करार करून मोबाईल कंपन्यांनीही इएमआयचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे महागातल्या  स्मार्टफोनकडेही ग्राहक सहज वळताना दिसतात. त्यामुळेच आता महागातल्या या स्मार्टफोनमधील कोणत्या मोबाईलची निवड करावी, अशी विचारणा करणाऱ्या फोनच्या संख्येतही वाढ झाली आहे. म्हणूनच अशा ग्राहकांसाठी हा सोबतचा तुलनात्मक तक्ता दिला देत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:08 am

Web Title: competition for top ranking best smartphone
टॅग : Mobile,Smartphone
Next Stories
1 स्मार्ट रिव्ह्य़ू : नोकिया लुमिआ ९२०
2 डेल इन्स्पिरेशन २३३०; डेस्कटॉपवर विंडोज आठ
3 सीगेट वायरलेस प्लस; साठवणूक करा वायरलेस
Just Now!
X