ऑनलाईन शॉपिंगचा लेखाजोखा

गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतातील ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. पूर्वी ऑनलाइन शॉपिंगबाबत एक असुरक्षेची भावना लोकांमध्ये होती. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग म्हणजे ‘नको रे बाबा’ असे म्हटले जायचे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतातील ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. पूर्वी ऑनलाइन शॉपिंगबाबत एक असुरक्षेची भावना लोकांमध्ये होती. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग म्हणजे ‘नको रे बाबा’ असे म्हटले जायचे. त्याचसुमारास पासवर्डची चोरी करून तुमच्या नावे, तुमच्या खात्यातून पैसे वळते केल्याच्या अनेक घटना एकाच वेळेस उघडकीस आल्या होत्या. अर्थात त्यावेळेस भारतातील इंटरनेटच्या वापराचा तो सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे सायबर कॅफेमध्ये असाल तर तुमच्या सीपीयूला पासवर्ड चोरी करण्याची जोडणी कुणी केलेली नाही ना, याची खातरजमा करा, असे आवर्जून सांगितले जायचे.
आता मात्र काळ बदलला आहे. आज एकूणच जीवनामध्ये असलेल्या व्यग्र अवस्थेत साधे वीज बिल किंवा फोन बिल भरण्यासाठी एक दिवस सुट्टी घेणे हे कुणालाही परवडणारे नाही. त्यामुळे बिलभरणा ऑनलाइन होण्यास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे दुसरीकडे आताच्या तरुण पिढीने ऑनलाइनला आपलेसे केले आहे. सुरुवातीस ऑनलाइनमध्ये झालेले काही गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर ऑनलाइनमध्ये चोराला पकडणे सोपे असते, हेही सर्वच संबंधितांना लक्षात आले. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांना आता बऱ्यापैकी सुरक्षितता लाभली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणजे ऑनलाइन व्यवहारांमध्ये झालेली वाढ. मध्यंतरी इ- बे या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या इ- कॉमर्स संकेतस्थळाने भारतातील एकूण ऑनलाइन प्रचलित बाबींच्या संदर्भात सर्वेक्षण केले. यात अनेक बाबी ठळकपणे लक्षात आल्या. त्याचवेळेस काही गावांनीही यात गंमतीशीर आघाडी उघडल्याचे लक्षात आले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर जळगाव आणि िदडोरी या दोन ठिकाणांहून उत्तम ऑनलाइन खरेदी होत असल्याचे लक्षात आले आहे. या सर्वेक्षणातील काही महत्त्वाच्या बाबी इ- बेने लोकसत्ता टेक इट साठी खास उपलब्ध करून दिल्या, त्या याप्रमाणे..

सर्वाधिक ऑनलाइन खरेदी होणाऱ्या वस्तू
१) लॅपटॉप
२) पुरुषांची वॉलेटस्
३) टॅब्लेटस्
४) पुरुषांची मनगटी घडय़ाळे
५) मोडेम्स

ऑनलाइन निर्यातीतील पहिले पाच
१) नैसर्गिक हिरे
२) फॅशनेबल नेकलेस
३) होमिओपथीची औषधे
४) साडय़ा
५) बगिचाकामासाठीची उपकरणे
ऑनलाइन आयात होणाऱ्या सर्वाधिक वस्तू
१) स्मार्ट फोन
२) नैसर्गिक हिरे
३) मनगटी घडय़ाळे
४) फॅशनेबल नेकलेस
५) मोबाईल स्क्रीन प्रोटेक्टर्स

सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार होणारी भारतातील ठिकाणे
१) दिल्ली
२) मुंबई
३) जयपूर
४) बेंगळुरू
५) चेन्नई
६) हैदराबाद
७) अहमदाबाद
८) कोलकाता
९) चंदीगढ
१०) पुणे

सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार होणारी राज्ये
१) महाराष्ट्र
२) दिल्ली
३) राजस्थान
४) तामिळनाडू
५) कर्नाटक
६) गुजरात
७) आंध्र प्रदेश
८) उत्तर प्रदेश
९) केरळ
१०)हरियाणा

सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार होणारे देश
(यात कुठेही भारताचा समावेश नाही, हे विशेष. याचाच अर्थ इतरांच्या तुलनेत आजही आपल्याकडे ऑनलाइन व्यवहार कमी होतात)
१) अमेरिका
२) ब्रिटन
३) ऑस्ट्रेलिआ
४) चीन
५) कॅनडा
६) जर्मनी
७) फ्रान्स
८) रशिया
९) हॉंगकाँग
१०) इटली

सर्वाधिक ऑनलाइन विक्री होणारे जागतिक ब्रॅण्डस्
१) सॅमसंग
२) अ‍ॅपल
३) सोनी
४) नोकिया
५) सॅनडिस्क
६) ब्लॅकबेरी
७) कॅनन
८) ट्रान्सेन्ड
९) मायक्रोमॅक्स
१०) निकॉन

ग्रामीण भारतातून शहरांच्या तुलनेत तसे कमी ऑनलाइन व्यवहार होत असले तरी पुढील तीन तक्त्यांवरून नजर फिरवली तर आपल्याला ग्रामीण भारतही ऑनलाइनमध्ये चांगलीच मुसंडी मारण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येईल
(महाराष्ट्रीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे या तीनही तक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील ज़ळगाव आणि दिंडोरी या दोन भागांचा प्रामुख्याने समावेश आहे)

सर्वाधिक ऑनलाइन खरेदी- विक्री व्यवहार होणारी ग्रामीण भारतातील ठिकाणे
१) गुंटूर (आंध्रप्रदेश)
२) चोऱ्यासी (गुजरात)
३) कार्थिकपल्ली (केरळ)
४) विल्लुपुरम (तामिळनाडू)
५) दिंडोरी (महाराष्ट्र)
६) जळगाव (महाराष्ट्र)
७) चिरायिन्कूझू (केरळ)
८) कुट्टालम (तामिळनाडू)
९) कुन्नाथूनाड (केरळ)
१० ) कदमा (झारखंड)

ग्रामीण भारतातील सर्वाधिक ऑनलाइन निर्यात व्यवहार
१) चोऱ्यासी (गुजरात)
२) कुट्टालम (तामिळनाडू)
३) जुही (उत्तर प्रदेश)
४) दिंडोरी (महाराष्ट्र)
५) उदूम्बनचोला (केरळ)
६) जळगाव (महाराष्ट्र)
७) कदम्बागच्छी (पश्चिम बंगाल)
८) गाद्रा (राजस्थान)
९) मीनाचिल (केरळ)
१०) गुंटूर (आंध्रप्रदेश)

ग्रामीण भारतातील सर्वाधिक ऑनलाइन आयात व्यवहार
१) गुंटूर (आंध्रप्रदेश)
२) दिंडोरी (महाराष्ट्र)
३) कार्थिकपल्ली (केरळ)
४) जळगाव (महाराष्ट्र)
५) चोऱ्यासी (गुजरात)
६) कुन्नाथूनाड (केरळ)
७) चिरायिन्कूझू (केरळ)
८) रामपूर (उत्तरप्रदेश)
९) मीनाचिल (केरळ)
१०) गदग (कर्नाटक)
ग्रामीण भारतात सर्वाधिक व्यवहार होणाऱ्या वस्तू
१) मोबाईल फोनची कव्हर केस
२) मोडेम्स
३) ब्लूटूथ हेडसेटस्
४) टॅब्लेटस्

ग्रामीण भारतातून होणारे सर्वाधिक ऑनलाइन निर्यात व्यवहार
१) नैसर्गिक हिरे
२) सलवार कमीझ
३) टॅटूज
४) सजावटीचे नक्षीदार खडे
५) साडय़ा

ग्रामीण भारतातून होणारे सर्वाधिक ऑनलाइन आयात व्यवहार
१) स्मार्टफोन
२) मनगटी घडय़ाळे
३) जीपीएस होल्डर्स
४) सोलार पॅनल्स
५)  लॅपटॉप्स

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Details of online shopping

ताज्या बातम्या