News Flash

कॅमेऱ्याची उत्क्रांती- पिनहोल ते सध्याची सेल्फीक्रांती

‘सेल्फी’ या संकल्पनेला आज आलेले महत्त्वही ही अत्यंत रोचक गोष्ट आहे.

कॅमेऱ्याची उत्क्रांती- पिनहोल ते सध्याची सेल्फीक्रांती
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्वतला व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून ‘सेल्फी’ या संकल्पनेला आज आलेले महत्त्वही ही अत्यंत रोचक गोष्ट आहे. एक काळ असा होता जेव्हा ‘सेल्फी’ म्हणजे कॅमेऱ्याच्या चौकटीत स्वतला जुळवून स्वतचे छायाचित्र काढणे इतकंच मर्यादित होते; तर आजच्या आधुनिक युगात परफेक्ट सेल्फी काढण्यासाठी एक मिनिटच पुरेसे असते. त्यानंतर पटापट असंख्य सेल्फी काढल्या जातात. हे अद्भुत आहे. आज ‘सेल्फी’ ही अशी संकल्पना आहे ज्याचे लोण जगभर पसरले आहे आणि आता तर ते अंतराळातही पोहोचले आहे. याचे श्रेय जाते ते कॅमेरा तंत्रज्ञानाला आणि फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याच्या सतत वाढत्या लोकप्रियतेला.

१५०० मध्ये मोझिया चिनी तत्त्ववेत्त्याने पिनहोल कॅमेऱ्याची ओळख करून दिली त्याला आता बराच काळ लोटला आहे. ही संकल्पना तेव्हा ‘कॅमेरा ऑब्स्क्युरा’नावाने ओळखली जाई. सोप्या शब्दांत सांगायचे तर लॅटिनमधला त्याचा अर्थ आहे, ‘डार्करूम’. या माहिती आणि शोधामुळे जग कायमचे बदलून गेले. त्यानंतर स्मृतींना फोटोंमध्ये बंद करण्याची जी पद्धत निघाली त्याने संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. प्रत्येकालाच त्यात सामील व्हायचे होते. पारंपरिक कॅमेऱ्याने आत्तापर्यंत बराच मोठा पल्ला गाठला आहे आणि आता त्याचा दुहेरी वापर केला जातो. व्यावसायिक फोटोग्राफर्स अर्थातच तुम्हाला सांगतील की, आठवणी जपण्यासाठी आणि पुरस्कारयोग्य फोटोंसाठी एसएलआर किंवा डी-एसएलआर कॅमेरा घेणे इष्ट आहे. पण मग, एखादी सामान्य व्यक्ती जिला केवळ आत्मानंदासाठी फोटो काढायचे आहेत, तिचं काय?

स्मार्टफोन क्रांतीमुळे आपले अख्खे जगच बदलून गेले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला अख्ख्या जगाशी जोडून ठेवण्याचे त्याचे नेमलेले काम तो करीत असला तरी त्याच्यामुळे अनेक नव्या धाटणीच्या कॅमेऱ्यांना अस्तित्व प्राप्त झाले. उच्च दर्जाच्या कॅमेरा अनुभवामुळे सध्याच्या आयुष्यात आनंददायी बदल घडून येतो. स्मार्टफोन ब्रॅण्ड्सनी हे पटकन ओळखले की आपला परफेक्ट सेल्फी यावा यासाठी लोक वेळ खर्च करतात आणि आपल्या फोटोंमधल्या बारीकसारीक तपशिलांबाबत ते खूप आग्रही असतात. म्हणूनच सेल्फीप्रेमींना आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी बहुतेक सर्वच स्मार्टफोन कंपन्यांमध्ये क्रांतिकारी फ्रंटफेसिंग कॅमेरे बाजारात आणण्यासाठी  अहमहमिका लागलेली दिसते.

ग्राहकांचे वर्तन झपाटय़ाने बदलत आहे. पारंपरिक आणि व्यावसायिक फोटोग्राफर्स जे पूर्वी तुमचे फोटो काढायचे, त्यांची जागा आता लांब सेल्फीस्टिक आणि स्मार्टफोनमधल्या फ्रंट कॅमेऱ्याने घेतली आहे. कुटुंब आणि मित्रामध्ये कॅमेरा वाटून घेण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. आजचा ग्राहक स्मार्ट, बुद्धिमान आणि आपल्या आवडीच्या उपकरणांची पूर्ण माहिती असणारा आहे. ते विकत घेणार असलेल्या उपकरणांची वैशिष्टय़ आणि पलूंबाबत आग्रही असतात. अखेरीस कॅमेरा हा सर्वच यूजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असणारा पलू असतो. या शोधामुळे फोटोग्राफीची कौशल्ये विकसित करण्याची आणि वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे परफेक्ट फोटो काढण्याची ग्राहकांची गरजही आता वाढली आहे.

स्मार्टफोन कॅमेऱ्यातून तुम्ही ज्या प्रकारचे आणि दर्जाचे फोटो काढू शकता, याचा विचारही केला तर तुम्ही स्तंभित व्हाल. या कॅमेऱ्यांच्या जगतात लागत असलेल्या विविध शोधामधले तंत्रज्ञान अचंबित करतं आणि तेच फोटोग्राफीत आवड असणाऱ्यांना आणि तांत्रिक बाबींमधल्या तज्ज्ञांना आकर्षति करतं. फोटो काढण्याची पारंपरिक पद्धतच मोडीत काढणाऱ्या या अद्वितीय शोधांमुळे फोटोग्राफीमध्ये नवी ‘सेल्फी’ पिढी उदयाला आली आहे. आज कॅमेरा हे प्रत्येकाचे  वैयक्तिक उपकरण बनले आहे. ‘फोटो काढा आणि तात्काळ शेअर करा’ ही मानसिकता बनली आहे. हे शेअिरग अर्थातच कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर केले जाते. हा आता जगण्याचाच एक भाग बनला आहे. आपले अनुभव लोकांबरोबर वाटण्याची तीव्र इच्छाच ‘सेल्फी’मागे असते. सातासमुद्रपलीकडे असणाऱ्या आप्तांना आपली ख्यालीखुशाली कळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. नव्या, अधिकजलद, अधिकच मंगल्या आणि अत्यंत प्रभावी अशा फ्रंट कॅमेऱ्यांनी आपल्या विचारांची आणि फोटो शेअर करण्याची संकल्पनाच बदलून टाकली आहे.

फ्रंट कॅमेऱ्याव्यतिरिक्त अशीही काही शिफारसपत्र अ‍ॅप्लिकेशन्स आहेत, जे फोटोंचा दर्जा सुधारण्यास आणि त्यात इतरही अनेक जोडण्यात मदत करतात. सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन्समुळे तुम्ही नुकताच काढलेला फोटो तात्काळ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवू शकता. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चांगल्या रेझोल्युशनने सज्ज असणाऱ्या फ्रंट कॅमेऱ्याची वाढती मागणी पाहता अनेक स्मार्टफोन उत्पादक स्मार्टफोनची अधिक चांगली आवृत्ती आणण्यावर विचार करण्यास प्रवृत्त झाले आहेत. आधुनिक जगातल्या सेल्फी कॅमेऱ्यांकडून कमी लाइट कपॅसिटीचे, धुरकट आणि अस्पष्ट प्रतिमा अपेक्षित नाहीत. स्वत:ला लोकप्रिय बनवण्यास अत्यंत उत्सुक असणारे नेहमीच उत्तम फ्रंट कॅमेऱ्याच्या शोधात असतात.

स्मार्टफोन फोटोग्राफी अधिक दर्जेदार बनवण्यासाठी आपले उत्तमोत्तम स्रोत पणास लावणाऱ्या एका स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने याबाबतीतले सगळे अडथळे दूर केले आहेत. या कंपनीने नुकताच आपला नवा फोन सादर केला आहे, ज्यामुळे सेल्फी काढण्याची संकल्पनाच आमूलाग्र बदलून गेली आहे. जेव्हा जेव्हा या फोनमधून सेल्फी काढली जाईल, तेव्हा तेव्हा यातले ब्युटिफिकेशन सॉफ्टवेअर आपली जादू दाखवील आणि तुम्हाला तेजस्वी, नितळ आणि नसíगक लुक प्रदान करील. ही उत्सुकता आणखी वाढेल, ती फ्रंट कॅमेऱ्याच्या फीचर्समध्ये नव्याने येऊन जोडलेल्या वैशिष्टय़ांमुळे. त्यासोबत खास डिझाइन केलेलं फ्लॅश तंत्रज्ञानही आहे. कंपनीच्या या शोधामुळे इतर स्पर्धक कंपन्यांना आपलं डोके अधिक खाजवावे लागेल, यात शंकाच नाही. फ्लॅशसाठी वापरण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामुळे तुमचा सेल्फीक्षण अधिक उत्कट बनतो. कारण यामुळे अत्यंत कमी उजेडात किंवा अंधारातही तसंच कोणत्याही वातावरणात स्मार्टफोन कॅमेऱ्याची जादू चालू शकते. परफेक्ट सेल्फी घेण्याचा हे वेड अधिक जोपासण्यासाठी मेगापिक्सेलना विस्तारता येऊ शकेल, जे तुमच्यासाठी कल्पनातीत असेल. आता ती स्वतच्या प्रतिमा घेण्यास उत्सुक असणाऱ्या उत्साही जिवांना मनाजोगते फोटो काढता येतील. इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत या स्मार्टफोनमध्ये अत्यंत पुढारलेली वैशिष्टय़े आहेत, ज्यामुळे हा फोन जवळपास सर्वोत्तमच बनला आहे.

विवेक झांग,सीएमओ, विवो

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 1:11 am

Web Title: marathi articles on the evolution in camera
Next Stories
1 कोणता टीव्ही घेऊ?
2 अ‍ॅपवर संपूर्ण जीएसटी
3 स्वत:चे संकेतस्थळ
Just Now!
X