टेक-नॉलेज

माझ्याकडे आयपॅड 5.1 आहे. यामध्ये आता पुढे अपटेड नसल्यामुळे त्यामध्ये नवीन अ‍ॅप्लिकेशन घेऊ शकत नाही.

* माझ्याकडे आयपॅड 5.1 आहे. यामध्ये आता पुढे अपटेड नसल्यामुळे त्यामध्ये नवीन अ‍ॅप्लिकेशन घेऊ शकत नाही. तर तो मला जेलब्रेक करायचा आहे. तर तसे करणे कितपत योग्य आहे. जेलब्रेक म्हणजे काय?
– दिगंबर ससाणे, नांदेड
* आयफोन, आयपॅड किंवा आयओएस असलेले कोणतेही उपकरण अ‍ॅपलच्या जाचातून मुक्त करणे म्हणजे जेलब्रेकिंग होय. खरेतर तो अ‍ॅपलचा जाच नव्हे. सुरक्षा म्हणून अ‍ॅपलने आयओएसवर अनेक र्निबध आणले आहेत. यामुळे आपल्याला अनेक अ‍ॅप्स वापरण्यापासून रोखले जाते. दुसऱ्या उपकरणातून शेअरिंग करण्याचीही सोय नसते. यामुळे अनेकदा शेअरिंगची आवड असणाऱ्यांना आयफोनधारकांना आपण स्मार्टफोन शेअरिंगच्या जगात एकाकी असल्यासारखे भासते. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. अशा एकाकी भावना असलेल्या किंवा अ‍ॅपलचे अपडेट्स येणे बंद झालेल्या उपकरणांना पुढे वापरण्यायोग्य आणि अद्ययावत ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने जेलब्रेक केले जाते. जेणेकरून आपण आयओएसच्या बंधनातून मुक्त होतो. फोन जेलब्रेक करण्याची एक तंत्रप्रणाली आहे. जी पूर्ण करण्याची काहीशी किचकट प्रक्रिया आहे. यामुळे ती तज्ज्ञाकडून करून घेणे योग्य ठरते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या फोनमध्ये आयओएस ऑपरेटिंग प्रणालीच काम करते. पण तेथे अ‍ॅपने विकसित न केलेल्या तिसऱ्याच कुणीतरी विकसित केलेले ‘सायडिया’ हे अ‍ॅप स्टोअर येते. या अ‍ॅप स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही यापूर्वी आयाओएसवर वापरू शकत नसेलेले सर्व अ‍ॅप्स वापरू शकता. ‘सायडिया’ या अ‍ॅप स्टोअरला ‘आयसी’ या अ‍ॅप स्टोअरचा पर्याय आहे. जेलब्रेक केल्यामुळे आपल्याला विविध अ‍ॅप्स वापरता येणे शक्य होते. तर आपण फोन आपल्या पद्धतीने वापरू शकतो. म्हणजे होमस्क्रीनवर अ‍ॅप कुठेही ठेवता येणे इथपासून ते सध्या सुरू असलेले अ‍ॅप शट डाउन करेपर्यंतच्या सुविधा यात मिळतात. मात्र या सर्वामध्ये अ‍ॅपलने पुरविलेली उच्च दर्जाची सुरक्षा आपण मुकतो. तसेच जेलब्रेक केलेले आयफोन्स किंवा आयपॅड्स क्रॅश होण्याचे प्रमाणही जास्त असते.
तंत्रस्वामी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jail break for ipod touch

ताज्या बातम्या