* सध्या सर्वत्र व्हीओएलटीईची चर्चा आहे. या तंत्रज्ञानाचा नेमका फायदा काय? 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– अमोल मुजुमदार, ठाणे</strong>

या वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली ती रिलायन्य जिओची. यामध्ये वापरण्यात आलेले व्हीओएलटीई तंत्रज्ञान ही वैशिष्टय़पूर्ण बाब ठरली आहे. हे तंत्रज्ञान देशात दूरसंचार क्षेत्रात प्रथमच रिलायन्सने वापरले. या तंत्रज्ञानात तुम्हाला व्हॉइस कॉल आणि इंटरनेट अशा दोन्ही सुविधा वापरता येतात. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या व्हॉइस कॉलचा वेग अधिक चांगला होतो, आवाजाचा दर्जाही वाढतो. तसेच कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाणही कमी होते.

* मला टीव्ही घ्यायचा आहे. तर मी फोर के किंवा फुल एचडीपैकी कोणता घेऊ यामध्ये मी गोंधळलो आहे. तर यापैकी कोणता घ्यावा.

समाधान शिरस्ते, औरंगाबाद</strong>

यामध्ये तुम्ही फोर केचा टीव्ही घ्यावा, कारण फुल एचडी आणि फोर के मध्ये पिक्सेलचा खूप जास्त फरक आहे. यामुळे  तुम्हाला चित्रांचा दर्जा फोर केमध्ये अधिक चांगला मिळू शकतो. फुल एचडीमध्ये १९२० बाय १०८० पिक्सेलचे रिझोल्यूशन असते तर हेच रिझोल्यूशन फोर केमध्ये ४००० बाय २१६० पिक्सेलचे मिळते. जेवढे पिक्सेल जास्त तेवढा चित्रांचा दर्जा चांगला असतो. यामुळे फोर केचा टीव्ही घेणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

या सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com  वर लॉगइन करा.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical question by readers
First published on: 24-01-2017 at 04:27 IST