Viral Video : असं म्हणतात, परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. आज आपण अशा एका महिलेविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे डबल एमए (MA) आणि पीएचडी (PHD) पर्यंत शिक्षण झाले आहे तरी सुद्धा त्या रस्त्यावर चहा विकतात. तुम्हाला वाटेल, असं का? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये या महिलेनी चहा विकण्यामागील कारण सांगितले आहे. या महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला सांगते, “माझे शिक्षण डबल एमए, पीचडी झाले आहे. ३६ वर्षांचा मला अनुभव आहे. मी एनजीओमध्ये सुद्धा काम केले आहे. वयामुळे मला आता नोकरी मिळणार नाही. माझे वय ५५ वर्ष आहेत. मी सेवा करते. कोरोनाच्या काळात मी खूप सेवा केली. गुरुद्वारमध्ये सुद्धा सेवा दिली. काही लोकांना मी माझ्या घरी सुद्धा ठेवले. बेघर महिलांना सहकार्य केले. त्यामुळे मी चहा विकायला सुरूवात केला. येथे राहण्यासाठी दहा हजार रुपये लागतात. मी रस्त्यावर झोपते आणि येथे भंडाऱ्यात मी जेवण करते. सकाळी चार वाजता मी दुकान सुरू करते आणि रात्री ८ वाजता बंद करते. मी करोडपती आहे, मी स्टाँग आहे.”
Lady Hardinge Hospital च्या गेट समोर या महिलेचे चहाचे दुकान आहे. या महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा जुना व्हिडीओ आहे, जो पुन्हा व्हायरल होत आहे.
हेही वाचा : VIDEO : तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
jalandharwaleofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डबल एमए पीचडी करून विकत आहे रस्त्यावर चहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला वाटतं आपण सुद्धा या महिलेप्रमाणे काहीतरी करायला पाहिजे. महिलेला खूप मोठा सलाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरं शिक्षण..” अनेक युजर्सनी या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.