News Flash

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा डोंबिवलीत मृत्यू

भरधाव एसटी बसच्या धक्क्याने कल्याणात राहणाऱ्या मनोज चव्हाण (३४) यांचा मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बसचालक अशोक कदम याच्या

| May 14, 2015 12:39 pm

भरधाव एसटी बसच्या धक्क्याने कल्याणात राहणाऱ्या मनोज चव्हाण (३४) यांचा मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बसचालक अशोक कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज चव्हाण हे  मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारे ते मोटरसायकलवरून शीळफाटा रस्त्याने कल्याणच्या दिशेने येत होते. लोढा हेवन पुलावर एसटीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात डोक्याला, तोंडाला गंभीर मार लागून चव्हाण यांचा मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 12:39 pm

Web Title: 2 died in bike st bus accident near dombivli
Next Stories
1 ५६ रु. नव्हे, ५ रु. ६२ पैसे
2 डोंबिवली येथील ‘एम्स’मध्ये रेडिएशन थेरपीची सुविधा
3 ज्येष्ठोत्सवात ज्येष्ठांसाठी रेड कार्पेट
Just Now!
X