News Flash

ठाण्यात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरात सोमवारी पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

शासनाच्या निर्देशानुसार ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसोबत खाजगी रुग्णालयांतही लसीकरण मोहीम घेण्यात आली आहे. यामध्ये शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी सर्वच नागरिकांना वेळेत लस मिळावी तसेच त्यांची गैरसोय होऊ  नये यासाठी ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्ट कोविड सेंटर, मनोरुग्णालय, कौसा रुग्णालय, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया, कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, आझाद नगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी. आर. वाडिया आरोग्य केंद्र, गांधी नगर, कळवा, कौसा आरोग्य केंद्र, किसन नगर, लक्ष्मी चिराग नगर आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र, माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकर नगर आरोग्य केंद्र आणि आनंदनगर आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

खाजगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत रुग्णालय, ज्युपिटर, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन रुग्णालय, हायवे रुग्णालय, पिनॅकल ऑर्थोकेअर रुग्णालय, हाईलँड हॉस्पिटल आणि कौशल्य रुग्णालयाला लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या वतीने पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. यामध्ये सी. आर. वाडिया, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्य आरोग्य केंद्र, कोरस, रोझा गार्डिनिया आणि कौसा आरोग्य केंद्रांचा सामावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 3:11 am

Web Title: coronavirus vaccination thane vaccination center at 36 places dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एक हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल मोफत
2 ठाण्यात भाजप नगरसेविकांचे आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन
3 रस्त्यामधील तुटलेल्या वाहिनीमुळे अपघाताची शक्यता
Just Now!
X