15 October 2019

News Flash

दुरुस्तीसाठी रेल्वेफाटक बंद

मध्य रेल्वेच्या खडवली रेल्वे स्थानकाजवळील खडवली नदीजवळ तसेच वावेघर येथे रेल्वे फाटक आहेत.

ठाणे : मध्य रेल्वेच्या खडवली रेल्वे स्थानकाजवळील दोन रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही दोन्ही फाटक टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या खडवली रेल्वे स्थानकाजवळील खडवली नदीजवळ तसेच वावेघर येथे रेल्वे फाटक आहेत. या दोन्ही फाटकांच्या तांत्रिक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असल्याने कसारा दिशेकडील असलेले वावेघर रेल्वे फाटक गुरुवार ते शनिवार या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे या फाटकातून ये-जा करणाऱ्या वाहनांना खडवली नदीजवळील असणाऱ्या फाटकात ये-जा करावी लागणार आहे. तर खडवली नदीजवळील फाटक रविवार ते बुधवारी या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत येथील वाहतूक ही वावेघर येथील फाटकातून सुरू राहणार आहे. मात्र, या कालावधीत दोन्ही फाटकांवर वाहतुकीचा ताण येण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत रेल्वे फाटक उघडे राहिल्यास त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर होण्याची शक्यता आहे.

First Published on September 19, 2019 4:49 am

Web Title: correction in central railway akp 94