महापालिका आयुक्तही अनुपस्थित
डोंबिवली शहर प्रदूषणमुक्त व्हावे, असा नारा देत आम आदमी प्रवासी संघटनेने जाहीर केलेल्या ‘वाहनमुक्त’ दिवसाला डोंबिवलीकरांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. या उपक्रमाकडे डोंबिवलीकरांनी पाठ फिरवलीच, शिवाय ठाणे वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमास अनुपस्थितीत राहिले. त्यामुळे या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला. एक दिवस सायकल चालवून प्रदूषण कमी होणार नाही, तर त्यासाठी काही ठोस उपाययोजना राबवाव्यात लागतील, अशा प्रतिक्रिया यानिमित्ताने डोंबिवलीकरांनी व्यक्त केल्या.
आम आदमी प्रवासी संघाच्या पुढाकाराने वाहनमुक्त डोंबिवलीचा नारा देत एक दिवस वाहनाशिवाय असा उपक्रम आखण्यात आला होता. त्यास शहर वाहतूक उपशाखा, डोंबिवली व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने साहाय्य केले होते. यानिमित्ताने डोंबिवलीत शनिवारी प्रदूषणमुक्त पर्यावरण दिवस व जनजागृतीसाठी वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी दहा वाजता वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. करंदीकर व महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या हस्ते या रॅलीची सुरुवात भागशाळा मदान येथून होणार होती. मात्र, हे दोघे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सायकल हाती घेत रॅलीला सुरुवात केली. डोंबिवलीतील मॉर्डन स्कूलचे विद्यार्थी, शहर वाहतूक शाखा रामनगर, विष्णुनगरचे वाहतूक पोलीस यांच्यासह आम आदमी प्रवासी संघाचे मोजके पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. भागशाळा मैदान येथून रॅलीची सुरुवात झाली. तेथून आई बंगला, चार रस्ता, मानपाडा रोडमार्गे ती घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.
नागरिक अनभिज्ञच..
आम आदमी पक्षाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला गेल्याने या कार्यक्रमावर पक्षीय छाप स्पष्टपणे दिसून येत होती. शिवाय हा कार्यक्रम डोंबिवलीकरांपर्यंत पोहोचविण्यात या पक्षाची यंत्रणा कमी पडली, अशी चर्चा आहे. निरोगी-आरोग्यदायी आयुष्यासाठी निदान एक दिवस तरी वाहनांचा त्याग करा, असे आवाहन करीत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सायकल भ्रमंती, तसेच पायी चालण्याची रॅली काढण्याचा आम आदमीचा प्रवासी संघाचा मानस होता. मात्र, असा दिवस शहरात साजरा केला जातोय याचा अनेकांना थांगपत्ताही नव्हता.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
raj thackeray, mns, Mahayuti, lok sabha 2024 election, Uddhav Thackeray group
महायुतीला पाठिंबा दिल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाकडे ओढा वाढला
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री