अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचा प्रस्ताव

वसई-विरार शहरात अनधिकृत बांधकामांचा झालेला सुळसुळाट, लोकांचीे स्वस्त घरांसाठी निर्माण झालेलीे गरज लक्षात घेऊन वसईतल्या बिल्डरांनी छोटी आणि स्वस्त घरे बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार दोन एफएसआय मिळाल्यास ६ ते ७ लाखात अडीचशे चौरस फुटांचीे घरे बांधून देणे शक्य होणार आहे. यामुळे शहरातीेल अनधिकृत बांधकामांचीे समस्या सुटेल आणि लोकांचीही फसवणूक होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.  अधिकृत इमारतीे बांधण्यास अडचणीे निर्माण झाल्याने बिल्डरांनी नवा पर्याय दिला आहे. सध्या वसईत बिल्डरांना एक एफएसआय मिळतो. जर दोन एफएसआय मिळाला तर अडीचशे चौरस फुटांचीे घरे सहा ते सात लाखात बांधून देऊ शकतो, असा पर्याय वसईतल्या बिल्डरांनी दिला आहे.

काय आहे हा प्रस्ताव?

सध्या वसई विरार शहरात छोटे म्हणजे साडेपाचशे चौरस फुटांचे घर घेण्यासाठी किमान पंधरा ते वीस लाख रुपये लागतात. मुंबईत राहणारे मध्यमवर्गीय तसेच श्रमिक वर्ग हा वसई-विरारमध्ये घर घ्यायला येतो. परंतु या ठिकाणी असलेलीे पंधरा ते वीस लाखांचीे घरं विकत घेणे परवडत नसल्याने ६ ते ७ लाखांमध्ये मिळणाऱ्या अनधिकृत घरांना प्राधान्य दिले जाते. ही घरे अनधिकृत असतातच, शिवाय बांधकाम निकृष्ट असते. ही घरे कुठल्याही क्षणीे पालिकेकडून तोडली जाऊ शकतात. अशावेळी जर दोन एफएसआय दिला तर अडीचशे फुटांची घरे बांधता येतील, असा वसईतल्या बांधकाम व्यावसायिकांचा प्रस्ताव आहे.

बिल्डरांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी

वसईच्या विविध पोलीस ठाण्यांत बिल्डरांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाच लाखांत घरे देण्याचे आश्वासन बिल्डर देतात. त्यांना भुलून मुंबईतला कष्टकरी श्रमिक वर्ग या बिल्डरांकडे पैसे भरतो. या बिल्डरांना अनधिकृत इमारती बांधण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांचीे आवश्यकता नसते. परंतु तेथे घर घेणाऱ्या लोकांना कर्ज, नोंदणीसाठी कागदपत्रांची आवश्यकता लागते. अनेकदा बोगस कागदपत्रे बनवली जातात. हे बिल्डर किंवा माफिया लोकांना घरे देत नाहीत, तसेच त्यांना पैसे घेण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात, असे या प्रकरणातील एक पीडित तक्रारदार गीता कोळंबकर यांनी सांगितले.

पालिकेच्या नव्या नियमांमुळे अधिकृत इमारतीे बांधण्यासाठी अडचणीे येत आहेत. वाढीव एफएसआय मिळाला की स्वस्तातलीे छोटी घरे बांधणे शक्य होईल आणि लोकांचीे गरज भागेल. अनधिकृत इमारतीे बांधणाऱ्या बिल्डरांपासून फसगतही होणार नाही.

-भालचंद्र पाटील, बिल्डर.

बिल्डरांना किमान दोन एफएसआय मिळाला तर ते छोटी घरे बांधून देऊ शकतात. अनधिकृ त बांधकामे तोडायलाच हवी. पण ते करताना ही बांधकामे का उभी राहतात याच्या मुळाशी जायला हवे. स्वस्तात आणि परवडणारी घरे मिळाली की लोक अनधिकृत घरे घेणार नाहीत आणि शहरात अनधिकृत वसाहती उभ्या राहणार नाहीत.

– अजीव पाटील, नगरसेवक, वसई-विरार.