धुरानंतर आता कचऱ्याच्या दरुगधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वसईच्या वादग्रस्त कचरा भूमीचा (डम्पिंग ग्राऊंड) प्रश्न पावसाळ्यात पुन्हा चिघळला आहे. हजारो टन कचरा पावसाळ्यात कुजल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. औषध फवारणी करून रोगराई पसरू देत नसल्याचा पालिकेने दावा केला आहे, तर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प लवकर सुरू करून ही समस्या कायमस्वरूपीे सोडविण्याचे आयुक्तांनी सांगितले.

वसई-विरार महापालिकेचा घनकचरा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने भोयदापाडा येथील कचराभूमी जवळच्या नागरिकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत होते. मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो. तेथील कचऱ्याला आगी लावल्या जात असल्याने रहिवाशांना प्रदूषणाची समस्या भेडसावत होती. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले होते. पालिकेने सुरक्षारक्षक नेमून तेथील कचऱ्यांवर पाणी फवारून ही समस्या तात्पुरती सोडवली होती. या समस्येतून जेमतेम सुटका होते, असे येथील रहिवाशांना वाटत असतानाचा पावसाळ्यात कचरा कुजल्याने दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सुमारे पाचशे टन कचरा या ठिकाणी टाकला जातो. पावसामुळे कचरा कुजून त्याची असह्य होणारी दरुगधी पसरू लागली आहे. त्यामुळे या कचराभूमीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे धुरामुळे प्रदूषण होत असल्याने प्रदूषण नियामक मंडळाने पालिकेवर गुन्हाही दाखल केला आहे. पालिकेकडे त्याबाबत काही अधिकृत माहिती नसल्याने ते निश्चित आहेत. पावसाळय़ात कचरा कुजून दरुगधी पसरत असल्याने पालिकेने त्यावर औषधफवारणी सुरू केल्याचे साहाय्यक आयुक्त (आरोग्य) सुखदेव दरवेशी यांनी सांगितले.

 घनकचरा प्रकल्प बंद

वसई-विरार महापालिका शहरात साठलेला कचरा वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे टाकला जाता. सव्‍‌र्हे क्रमांक ३० अ, ३१ आणि ३२ ही जागा कचरा भूमीसाठी आरक्षित आहे. पूर्वी या जागेवर घनकचरा प्रकल्प राबविला जात होता. परंतु २०१३ पासून या ठिकाणाच घनकचरा प्रकल्प बंद आहे. कचऱ्यावर माती टाकून तो बुजविण्याच्या कामातही भ्रष्टाचार झाला होता.

वादग्रस्त घनकचरा प्रकल्प राबविण्याऐवजी कचऱ्यापासून वीजनिर्मितीे करण्याचे पालिकेने ठरवले आहे. परंतु अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. अनेक कंपन्या यासाठी पुढाकार घेतला आहे. नेमके कुठले तंत्रज्ञान वापरायचे ते अद्याप निश्चित झालेले नाही. लवकरच ते निश्चित करून हा प्रकल्प सुरू केला जाईल.

– संजय जगताप, नगररचना संचालक

निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवडय़ात मंजुरी मिळून काम सुरू होईल. त्यानंतर कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू होईल.

– सतीश लोखंडे, आयुक्त

कचराभूमीतला कचरा कुजल्याने दरुगधी येत आहे. परंतु वेळोवेळी औषध फवारणी करत आहोत. रोगराई पसरणार नाही याची खबरदारी घेत आहोत.

–  सुखदेव दरवेशी, साहाय्यक आयुक्त, आरोग्य व स्वच्छता विभाग