वाडा तालुक्यातील प्रकार ; बोगस भातबियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विजया’ जातीचे गरवे भातबियाणे हे हळवे निघाले. हा धक्कादायक प्रकार वाडा तालुक्यातील मौजे पिक येथील शेतकऱ्याच्या शेतात घडला आहे. पालघर व ठाणे जिल्हय़ात भात उत्पादकांना हा अनुभव मिळत आहे. जालना येथील सफल बायो सीड या कंपनीचे हे बियाणे असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.  हे भातबियाणे अति गरव्या (१३५ ते १४० दिवसांचे) जातीतील असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या भाताची लागवड गरव्या जमिनीत केली आहे. मात्र लागवड केल्यापासून ६० ते ७० दिवसांतच या भाताला निसावा येणे सुरू झाले आहे. दीपक पाटील या शेतकऱ्याने वाडा येथील एका कृषी सेवा केंद्रातून हे ‘विजया’ जातीचे भातबियाणे ४८ किलो खरेदी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harvesting due to bogus seeds loss of farmers
First published on: 06-09-2018 at 02:40 IST