28 February 2021

News Flash

अर्नाळय़ाच्या जंगलात हातभट्टीचा खुलेआम धंदा

पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांचे दुर्लक्ष; तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल

वसईतील अर्नाळा किल्ल्याच्या जंगलात मोठय़ा प्रमाणावर हातभट्टीच्या दारूची निर्मिती केली जात असून राजरोसपणे आणि खुलेआम सुरू असलेल्या या हातभट्टीच्या धंद्याकडे उत्पादन शुल्क विभागा अािण पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या भागात हातभट्टय़ांचा धूर सतत दिसत असतो. त्यासाठी किनारपट्टीवरील तिवरांच्या झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तली करण्यात आली आहे. पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

विररार स्थानकापासून पश्चिमेला केवळ ६ ते ७ किलोमीटर अंतरावर समुद्रातील एका बेटावर अर्नाहा किल्ला आहे. पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश यांच्या संघर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या जलदुर्गामध्ये सध्या अनैतिक गोष्टीच जास्त होत आहे. किनारपट्टीवरील जंगलात अनेक ठिकाणी हातभट्टय़ा लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी तयार झालेली दारू वसईच्या इतर भागासह ठाणे, पालघर आणि मुंबईत पाठवली जाते.

इथल्या किनाऱ्यावरून जलमार्गाने दारूची वाहतूक केली जाते. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दारू बनविण्याच्या प्रक्रियेतून निघणारे टाकाऊ  पदार्थ, कचरा थेट समुद्रात सोडला जातो. त्यामुळे येथील समुद्रही आता दूषित होऊ  लागला आहे.

दारू तयार झाल्यावर बोटीतून तिची बेधडक वाहतूक केली जाते, तसेच दारू बनवण्यासाठी लागणारा काळा गूळही बोटीतून आणला जातो. येथून जवळच उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. परंतु त्यांनी या ठिकाणी सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे.

कारवाई थंडावली

मालवणी गावठी दारूच्या घटनेनंतर अर्नाळा येथे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून अनेकांवर करवाई केली होती. मात्र त्यानंतर पोलिसांची कारवाई आता थंडावली आहे. मुंबई परिसराला वसईतून सर्वात मोठा दारूचा साठा पुरवला जातो. मालवणी येथे झालेल्या दारूकांडातील हातभट्टीची दारू वसई, अर्नाळा येथून आणण्यात आली होती, अशी माहिती पोलिस चौकशीदरम्यान समोर आली होती. मात्र तरीही पोलीस अर्नाळा किल्ला परिसरात कानाडोळा का करीत आहेत, असा सवाल नागरिक करीत आहेत.

पोलिसांचा बचावात्मक पवित्रा

चारही बाजूंनी पाणी असल्याने हातभट्टीच्या धंदा करणाऱ्यांना ही जागा सुरक्षित वाटते. पोलीस आल्याचे त्यांना तात्काळ समजते आणि ते पसार होत असतात, असा बचावात्मक पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.

अर्नाळा जंगल परिसरात आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. अर्नाळा किल्ला परिसरात ज्या ठिकाणी गावठी दारूचे उत्पादन होते, त्याची माहिती मिळवून त्या भागात आम्ही कारवाई करू.

– संदीप शिवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:26 am

Web Title: hath bhatti daru business in karnala forest
Next Stories
1 आरोप केलेत..आता पुरावे द्या!
2 वडोदरा-जेएनपीटी महामार्गाला बदलापूरजवळील गावांचा विरोध
3 गरीबरथमध्ये दाम्पत्याला मारहाण
Just Now!
X