29 September 2020

News Flash

मीरा रोड सोयीचे ठिकाण

‘इन्स्पेक्टर कूक’ म्हणून रंगभूमीवर ओळख निर्माण झालेला कलावंत म्हणजे सचिन देशपांडे.

सचिन देशपांडे

अनेक कलावंतांना आपण टीव्ही मालिका, नाटक, सिनेमांमधून छोटय़ा-मोठय़ा भूमिका करताना पाहात असतो. परंतु नावाने त्यांची ओळख आपल्याला बऱ्याचदा ठाऊक नसते. टीव्ही मालिकांमध्ये छोटय़ा-मोठय़ा भूमिका करणारा परंतु, ‘इन्स्पेक्टर कूक’ म्हणून रंगभूमीवर ओळख निर्माण झालेला कलावंत म्हणजे सचिन देशपांडे. मूळचा नागपूरकर असलेल्या सचिनने राज्य नाटय़ स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, नागपूरस्थित बंगाली असोसिएशन संस्थेतर्फे हिंदी नाटकांतून कामे केली. ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या नाटकातील इन्स्पेक्टर कूक या भूमिकेमुळे सचिन देशपांडे चांगलाच गाजला. त्याच दरम्यान ‘जावई माझा भला’, ‘खरं सांगायचं तर’ यांसारख्या नाटकांनंतर ‘मी मराठी’ वाहिनीवरील ‘दोष ना कुणाचा’, झी मराठीवरील ‘अनुबंध’ यांसारख्या मालिकांमधील भूमिका मिळाल्यानंतर सचिन देशपांडे मालिकांमध्ये अधिक दिसू लागला. ‘मला सासू हवी’, ‘जावई विकत घेणे आहे’ यांसारख्या मालिकांमधील सचिनच्या भूमिका प्रेक्षकांना माहीत आहेत.

*आवडते मराठी चित्रपट-  ‘उंबरठा’, व्ही शांताराम यांचे सर्वच मराठी चित्रपट, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’.

*आवडते हिंदी चित्रपट- ‘शोले’, अमिताभ बच्चनचे ‘शक्ती’, ‘मुगल ए आझम’, ‘मदर इंडिया’, गुरुदत्त यांचे सगळे चित्रपट, ‘गाइड’.

*आवडती नाटकं- ‘मु. पो. बोंबिलवाडी’, ‘प्रासंगिक करार’, ‘बॅरिस्टर’, ‘मी माझ्या मुलांचा’.

*आवडते अभिनेते- विक्रम गोखले, आमिर खान, मोहन जोशी, अतुल कुलकर्णी, सुबोध भावे, ओम पुरी, सतीश शहा.

*आवडत्या अभिनेत्री- स्मिता पाटील, शबाना आझमी, गीतांजली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, रिमा लागू, नीना कुलकर्णी.

*आवडते दिग्दर्शक- चंद्रकांत कुलकर्णी, प्रियदर्शन, महेश तागडे, जयंत पवार, अजय मयेकर, दीपक नलावडे, उमेश नामजोशी.

*आवडते लेखक / नाटककार- पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, श्री. ना. पेंडसे, जी. ए. कुलकर्णी, नारायण धारप.

*आवडलेल्या भूमिका- ‘बॅरिस्टर’मधील भूमिका, बच्चनच्या ‘अग्निपथ’मधील विजय दीनानाथ चौहान, ‘पिकू’मधील भूमिका, प्रत्येक  सीनचा ग्राफ मेंटेन करणे ही खूप गोष्ट.

*आवडते सहकलावंत- विक्रम गोखले, मोहन जोशी, शरद पोंक्षे.

*आवडता खाद्यपदार्थ- वडा, भात, पुरणाची पोळी.

*आवडता फूडजॉइण्ट- मीरा रोड येथील चिकन शोर्मा मिळणारे स्टॉल्स.

*आवडतं हॉटेल- गोरेगावचे ओबेरॉय मॉलमधील ‘बीबीसी’, मीरा रोड येथील ‘साई पॅलेस’.

*मीरा रोडविषयी- मीरा रोडला २००६ साली राहायला आलो. आधी भाडय़ाने येथे राहात होतो. त्या वेळी मीरा रोडला राहणे हे प्रशंसनीय नव्हते.  अमराठी वस्ती मोठय़ा प्रमाणावर असलेले आणि गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात असलेले ठिकाण असेच लोकांना वाटायचे. परंतु मीरा रोडची    सांगण्यासारखी वैशिष्टय़े म्हणजे ‘कनेक्टिव्हिटी’. बस, लोकल आणि स्वत:च्या वाहनानेही मुंबई-ठाणे आणि सर्वच ठिकाणी जाणे-येणे  सोयीचे ठरणारे असे हे ठिकाण आहे. त्याचबरोबर इथे मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम शाळा आहेत. आता मराठी लोकांची संख्याही मीरा  रोडमध्ये भरपूर आहे.  शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे अशा सर्व सोयीसुविधा इथे आहेत. महामार्गाजवळचे ठिकाण म्हणूनही मीरा रोड सोयीचे  ठरते. त्यामुळे मीरा रोडमध्ये राहणे सोयीचे वाटते.

शब्दांकन- सुनील नांदगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:04 am

Web Title: information about sachin deshpande
टॅग Information
Next Stories
1 नाताळोत्सव उत्साहात!
2 हर एक फ्रेंड जरूरी नही होता है!
3 बदलापुरात मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनावर संभ्रम
Just Now!
X