News Flash

कल्याण-डोंबिवलीतील लॉकडाउन शिथिल, पण ‘या’ प्रभागांमध्ये ३१ जुलैपर्यंत कायम

कंटेनमेंट झोनमध्ये होणार लॉकडाउनच्या नियमांची अंमलबजावणी

संग्रहित छायाचित्र

लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रसार वाढल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. १२ जुलै ते १९ जुलै या कालावधीसाठी या महापालिका क्षेत्रात लॉकडाउन लागू करण्यात आला. आज (१९ जुलै) लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश आयुक्तांनी काढले असून, काही कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात सुरूवातीला २ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सुरु ठेवण्यात आली होती. तर मेडिकलची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन १२ जुलैपासून लॉकडाउनला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर महापालिकेनं लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याबद्दलचे आदेश काढले असून, कंटेनमेंट झोनला यातून वगळण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

हॉटस्पॉटच्या यादीत असलेले प्रभाग

टिटवाळा गणेश मंदिर (१/अ प्रभागक्षेत्र)

मोहने गावठाण (१/अ प्रभागक्षेत्र)

शहाड (१/अ प्रभागक्षेत्र)

गांधारे (२/ब प्रभागक्षेत्र)

बारावे गोदरेज हिल (२/ब प्रभागक्षेत्र)

खडकपाडा (२/ब प्रभागक्षेत्र)

वायले नगर (२/ब प्रभागक्षेत्र)

फडके मैदान (२/ब प्रभागक्षेत्र)

रामदासवाडी (२/ब प्रभागक्षेत्र)

रामबाग सिंडीकेट (२/ब प्रभागक्षेत्र)

बेतुरकरपाडा (३/क प्रभागक्षेत्र)

चिखलेबाग-मल्हार नगर (३/क प्रभागक्षेत्र)

अहिल्याबाई चौक (३/क प्रभागक्षेत्र)

जोशीबाग (३/क प्रभागक्षेत्र)

बैलबाजार (३/क प्रभागक्षेत्र)

गोविंदवाडी (३/क प्रभागक्षेत्र)

कोळसेवाडी (४/जे प्रभागक्षेत्र)

कचोरे (४/जे प्रभागक्षेत्र)

लोकग्राम (४/जे प्रभागक्षेत्र)

शास्त्रीनगर-तिसगाव (५/ड प्रभागक्षेत्र)

संतोषनगर-तिसगाव (५/ड प्रभागक्षेत्र)

नेहरूनगर (५/ड प्रभागक्षेत्र)

विजय नगर (५/ड प्रभागक्षेत्र)

कांचनगाव खंबालपाडा (६/फ प्रभागक्षेत्र)

चोळेगाव (६/फ प्रभागक्षेत्र)

पेंडसे नगर (६/फ प्रभागक्षेत्र)

टिळकनगर (६/फ प्रभागक्षेत्र)

सारस्वत कॉलनी (६/फ प्रभागक्षेत्र)

गोग्रासवाडी (६/फ प्रभागक्षेत्र)

गरीबाचा वाडा (७/ह प्रभागक्षेत्र)

देवीचा पाडा (७/ह प्रभागक्षेत्र)

जय हिंद कॉलनी (७/ह प्रभागक्षेत्र)

विष्णू नगर (७/ह प्रभागक्षेत्र)

कोपररोड (७/ह प्रभागक्षेत्र)

जुनी डोबिंवली (७/ह प्रभागक्षेत्र)

राजाजी पथ (८/ग प्रभागक्षेत्र)

म्हात्रेनगर (८/ग प्रभागक्षेत्र)

तुकाराम नगर (८/ग प्रभागक्षेत्र)

रघुवीर नगर (८/ग प्रभागक्षेत्र)

पांडुरंगवाडी (८/ग प्रभागक्षेत्र)

पिसवली (९/आय प्रभागक्षेत्र)

चिंचपाडा-नांदीवली (९/आय प्रभागक्षेत्र)

दावडी (९/आय प्रभागक्षेत्र)

आजदे (१०/ई प्रभागक्षेत्र)

डोबिंवली एमआयडीसी (१०/ई प्रभागक्षेत्र)

सागाव-सोनारपाडा (१०/ई प्रभागक्षेत्र)

नांदीवली-पंचानद (१०/ई प्रभागक्षेत्र)

भोपर-संदप (१०/ई प्रभागक्षेत्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 5:20 pm

Web Title: lockdown withdrawn from kalyan dombivali municipal corporation area bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाण्यात मालमत्ता करात सवलत
2 खासगी करोना रुग्णालयांची शुल्क मनमानी उघड
3 ठाण्यातल्या हॉटस्पॉटमध्येच लॉकडाउन, इतर भागांमध्ये मिशन बिगिन अगेन!
Just Now!
X