‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवल’चे अभिनेता संतोष जुवेकरकडून कौतुक
tv03‘ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंवर त्यांना आकर्षक बक्षिसे देण्याचा ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवल’चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे वाचक आणि वृत्तपत्रातील नाते अधिक दृढ बनते,’ अशा शब्दांत अभिनेता संतोष जुवेकर याने ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवल’चे कौतुक केले. गेल्या तीन वर्षांपासून ठाणे आणि परिसरातील ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे देणाऱ्या या फेस्टिवलचा प्रथम पारितोषिक समारंभ शुक्रवारी ठाण्यातील गोखले रोड येथील कलानिधी दुकानात पार पडला. या वेळी संतोष जुवेकर, अभिनेत्री सायली संजीव, ‘पोलीस लाइन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू पार्सेकर आणि कलानिधीचे अमित कारिआ यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
२२ जानेवारीपासून सुरू झालेल्या लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलमध्ये विजयी ठरलेल्या पहिल्या पाच दिवसांच्या भाग्यवान विजेत्यांना वामन हरी पेठे अ‍ॅण्ड सन्स यांच्याकडून एक ग्रॅम सोन्याचे नाणे, शगून, लगून, अंकुर ज्वेलर्स अशा विविध दुकानांमधून आकर्षक पारितोषिके देण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करताना सायली संजीव हिने ‘खरेदीची आवड असणाऱ्या महिलांसाठी हा अतिशय योग्य उपक्रम आहे,’ असे सांगितले. ‘पोलीस लाइन’ या चित्रपटातून सायली सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या कार्यक्रमादरम्यान संतोषने ‘पोलीस लाइन’ चित्रपटाची माहिती उपस्थितांना दिली. ‘पोलिसांच्या जीवनावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे,’ असे तो म्हणाला.
कलानिधी दुकानामध्ये विजेत्यांची नावे जाहीर करत असताना पारितोषिक वितरण समारंभात उपस्थितांचा उत्साह दिसून येत होता. वीकेण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्टकॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून युनियन बँक आणि प्रशांत कॉर्नर असोसिएट पार्टनर आहेत.
त्याचप्रमाणे प्लॅटिनम पार्टनर झेना डिझाइन, हस्तकला, वागडस्, मायक्रो फाइन, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर, वॉर्डरोब पार्टनर दी रेमण्ड शॉप, गिफ्ट पार्टनर कलानिधी, वामन हरी पेठ अ‍ॅण्ड सन्स, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स आणि ओंकार किचन वर्ल्ड, नॉलेज पार्टनर रिलायबल अ‍ॅकॅडमी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स द ग्रिल हाऊस हे आहेत.

‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवल’ला बक्षिसांची जोड
फेस्टिवलमधील विजेत्यांची नावे
राजेश चव्हाण, बदलापूर – शगुन साडीजचे गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
अवंतिका वाडेकर, ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
रेखा सावंत, ठाणे – लगुन गिफ्ट वाऊचर
अनघा रेडीज, ठाणे – शगुन साडीजचे गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
दर्शना घुस, ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
गौरव कुम्डाळकर, परेल – लगुन गिफ्ट वाऊचर
समीर सावळ, ठाणे – शगुन साडीजचे गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे

सुरेंद्र पटवर्धन, ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
पी. पी. जयरामन, ठाणे – लगुन गिफ्ट वाऊचर
जितेंद्र रावळ, कल्याण – शगुन साडीजचे गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
राजेश सुतार, ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
अजय भगत, ठाकुर्ली – लगुन गिफ्ट वाऊचर
धीर बुवा, ठाणे – शगुन साडीजचे गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
ईशा परांजपे – सुलोच गिफ्ट वाऊचर, चांदीचे नाणे
अनिल चोरगे, ठाणे – लगुन गिफ्ट वाऊचर

प्रभात सोनावणे, अंजली अनोहळे, ठाणे , स्वरूपा चव्हाण, टिटवाळा, प्रज्ञा परब, भांडुप, गोपाळ ठाकरे, कल्याण – सर्वाना इस्त्री
सुजाता परब, शिरीष घरत, सुधीर मूव्हेकर ठाणे , माधुरी आष्टेकर, संगीता कुलकणी, कल्याण- सर्वाना सोन्याचे नाणे

हा उपक्रम केवळ ग्राहक आणि दुकानदार या दोघांनाही एकत्र आणणारा नसून वाचकांना एक वेगळा आनंद देणारा आहे. ‘शॉपिंग फेस्टिव्हल’सारखा ग्राहकोपयोगी उपक्रम राबवून ‘लोकसत्ता’ने ठाणेकरांसाठी बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘खरेदी करा आणि जिंका’ अशा स्वरूपाचा उपक्रम ठाणेकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल. ‘लोकसत्ता’च्या या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.
– संतोष जुवेकर, अभिनेता

सोने असो वा चांदी किंवा इतर कोणतीही वस्तू बक्षीस काय मिळाले यापेक्षा ते आपल्याला मिळाले याचा आनंद अधिक असतो. सर्व विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तितकाच आनंद होत आहे. ‘लोकसत्ता’ने आम्हाला या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद.
राजू पार्सेकर, ‘पोलीस लाइन’ चित्रपटाचे दिग्दर्शक.

‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ची माहिती मिळाली म्हणून यामध्ये आवर्जून भाग घ्यावा असे वाटले. आज मला ‘लोकसत्ता’मुळे चांदीचे नाणे बक्षीस मिळाले. याचा खूप खूप आनंद होत आहे. लोकसत्ताचे मनापासून आभार. अशा कार्यक्रमामुळे प्रसिद्ध कलाकारांशी भेट झाली याचाही आनंद झाला.
– धीर बुवा, विजेते.

ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सुवर्णमुद्रा जिंकण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने नशीब आजमावता आले याचा आनंद होत असला, तरी जे वर्तमानपत्र गेल्या अनेक वर्षांपासून वाचतो आहे त्या वर्तमानपत्राकडून मिळालेली ही भेट हा आनंदाचा ठेवा आहे. बक्षीस लागणे हे आताच्या काळात केवळ फसवणुकीचे वाटते, परंतु प्रत्यक्षात अनुभव घेतल्यावर विश्वास पटला. ‘लोकसत्ता’ने दिलेला हा सन्मान खूप मानाचा आहे.
– संगीता कुलकर्णी, विजेत्या.

हा उपक्रम सामान्य वाचकांशी जोडणारा असा असून प्रत्येक दिवशी खरेदी करणाऱ्यांना मिळणारे बक्षीस ही आनंददायीच गोष्ट आहे. ‘लोकसत्ता’ने त्यासाठी पाऊल उचलून अत्यंत चांगल्या पद्धतीने हा महोत्सव साजरा केला आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रमसुद्धा अधिक देखणा आहे.
– सायली संजीव, अभिनेत्री.
========