कल्याण, विठ्ठलवाडी आगारातून सोडण्यात येणाऱ्या जादा बसचे वेळापत्रक जाहीर

राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण, विठ्ठलवाडी आगारातून २५ फेब्रुवारी ते एक मार्चदरम्यान कोकणात विशेष बस गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. होळीसाठी कोकणात चाकरमानी मोठय़ा संख्येने जातात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने कोकणात विशेष बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Varandh Ghat closed for traffic till May 30
रायगड : वरंध घाट ३० मे पर्यंत वाहतुकीसाठी बंद
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
uran revas marathi news, karanja to revas ro ro service marathi news
उरण: करंजा-रेवस रो रो जलसेवेचे काम पुन्हा लांबणीवर

कोकण प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्या बैठकीत कोकणातील चिपळूण, दापोली, गुहागर, कासे-माखजन, चिंद्रावळे-गराटेवाडी, ओवळी, कळमणी, अलिबाग, महाड, अंबवडे, रत्नागिरी, कोतवाल, दिवे आगार येथे विशेष बस गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

बसचे वेळापत्रक

कल्याण आगार

’ २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी तसेच गुहागरसाठी रात्री ८.३० वा

’ २६ फेब्रुवारी रोजी गुहागरसाठी रात्री ८.३० वा., दापोलीसाठी रा. ९ वाजता

’ २७ फेब्रुवारी रोजी महाडसाठी सका. ७ वा., अंबवडेसाठी स. ८वा., रत्नागिरीसाठी रा. ८ वा., गुहागरसाठी रात्री ८.३० वा., दापोलीसाठी रा. ९ वा.

’ २८ फेब्रुवारी रोजी महाडसाठी स. ७ वा., कोतवालसाठी स. ७.१५ वा., दिवेआगारसाठी स. ७.३० वा., अंबवडेसाठी स. ८ वा., अलिबागसाठी स. ८.१५ वा., रत्नागिरीसाठी रा. ८ वा. गुहागरसाठी रा. ८.३० वा., दापोलीसाठी रात्री ९ वाजता

’ १ मार्च रोजी महाडसाठी स. ७ वा., कोतवालसाठी स. ७.१५ वा., दिवेआगारसाठी स. ७.३० वा., अंबवडेसाठी स. ८ वा., अलिबागसाठी स. ८.१५ वा., दापोलीसाठी रा. ९ वा.

विठ्ठलवाडी आगार

’ २५ फेब्रुवारी रोजी चिपळूणसाठी सकाळी ५.४५ वा., रत्नागिरी रात्री ८.०० वा., गुहागर रा. ८.३० वा. आणि चिंद्रावळे रा. ९.३० वाजता

’ २६ फेब्रुवारी रोजी चिपळूणसाठी स.५.४५ वा., देवरूखसाठी रा. ७.३०वा., रत्नागिरीसाठी रा. ८ वा., गुहागरसाठी रात्री ८.३०वा., चिंद्रावळेसाठी रात्री ९.३० वा. आणि दापोलीसाठी रा. १० वाजता

’ २७ फेब्रुवारी रोजी चिपळूणसाठी स. ५.४५ वा., पोलादपूर स. ६.३०वा., देवरूखसाठी रात्री ७.३० व ८.३०, गुहागर रा. ८.३०, कासे माखजन रा. ९, चिंद्रावळे रा. ९.३०, दापोली रा. १०, कळमणी रा. १०.३०, ओवळी रा. १०.३० व १२.३०.

’ १ मार्च रोजी चिपळूण स. ५.४५, पोलादपूर स. ६.३०, अलिबाग स. ७.३०, चिंद्रावळे रा. ९.३०, दापोली स. ९.३०