20 January 2020

News Flash

भाईंदरमध्ये तरुणीची हत्या

कुंदन आचार्य तरुणाचे अंकिता हिच्याशी गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

भाईंदर पूर्व येथील तलाव रोड परिसरात अंकिता रावल या २२ वर्षीय तरुणीची मंगळवारी तिच्या प्रियकराने प्रेमप्रकरणातून गळा चिरून हत्या केली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:च्या गळ्यावर देखील वार केले. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुंदन आचार्य तरुणाचे अंकिता हिच्याशी गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कुंदन आपल्या तलाव रोड भागातील दुकानात बसला असताना अंकिता त्या ठिकाणी आली. दोघांमध्ये वादविवाद झाला. त्यानंतर कुंदन याने अंकिताच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यात अंकिता हिचा दुकानातच मृत्यू झाला. अंकिताची हत्या केल्यानंतर कुंदनने स्वत:च्या गळ्यावर देखील वार केला. कुंदन जखमी अवस्थेत दुकानाबाहेर पडल्याचे आसपासच्या लोकांना दिसून आले. याच वेळी दुकानाच्या आत अंकिता मृतावस्थेत पडली असल्याचे आणि तिचा गळा चिरण्यात आला असल्याचे दिसून आल्याने नवघर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जखमी कुंदन याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग करत आहेत.

First Published on October 23, 2019 2:19 am

Web Title: murder girl in bhayandar akp 94
Next Stories
1 बाजार सजले.. पदपथ अडले!
2 कल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद
3 गर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच
Just Now!
X