कल्याण-डोंबिवलीत भाजी आणि किराणा दुकाने पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ७ एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साथ रोग प्रतिबंधक कायदा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार संध्याकाळी पाचनंतर मेडिकल स्टोअर्स आणि क्लिनिक वगळता जीवनावश्यक वस्तू, बेकरी, दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाला इ. खाद्यपदार्थ बंद ठेवण्यात यावीत असं स्पष्ट केलं आहे.

मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये आणि क्लिनिक वगळता इतर संबंधित व्यावसायिक आस्थापना व दुकाने यांचे मालक व संबंधितांनी या आदेशाचे उल्लंघन केले तर दंडात्मक कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No vegetable and grocery shops will be open in kalyan and dombivali area from tomorrow scj
First published on: 06-04-2020 at 18:56 IST