04 March 2021

News Flash

चंद्रशेखर टिळक यांचे ‘भावतरंग’ उलगडले!

दंशाची दाहकता शानदार स्पर्शाने समर्थपणे सामोरी आणणारी ‘भावतरंग’मधील कविता आहे.

चंद्रशेखर टिळक यांच्या ‘भावतरंग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन  डॉ. मृदुला दाढे-जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

डोंबिवलीमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

‘भावतरंग’मधील कवितांमध्ये अनुभवांचा विस्तार आणि शब्दांची चपखलता आहे. अलंकारापेक्षा प्रामाणिकपणाला प्राधान्य देणारी या कविता भाषेचे सच्चेपण दाखवितात आणि अर्थशास्त्राचे नेटकेपणा यांचा सर्वोत्कृष्ट संगम घडवितात. मुक्तछंदात असलेल्या या कविता येत्या काळात गायन रूपात येऊ शकतात’, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी येथे केले.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखक व नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांच्या ‘भावतरंग’ या कवितासंग्रहाचे शास्त्री सभागृहातील कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायक विनायक जोशी, मुग्धा घैसास, गौरी देव, जयदीप जोशी, प्रा. डॉ. प्रसाद भिडे उपस्थित होते. प्रतिभेला स्पर्श असतो. तसा दंशही असतो.

दंशाची दाहकता शानदार स्पर्शाने समर्थपणे सामोरी आणणारी ‘भावतरंग’मधील कविता आहे. अर्थशास्त्राचा एक अभ्यासक कवितेच्या माध्यमातून समाजासमोर येत असला तरी, त्याच्या कवितेत जराही नवखेपणा दंशाची दाहकता शानदार स्पर्शाने समर्थपणे सामोरी आणणारी ‘भावतरंग’मधील कविता आहे. नाही. टिळक यांनी आपले अनुभव विश्व या कवितेच्या माध्यमातून उलगडले आहे. शब्दांची चपखलता, अनुभवाचा विस्तार, अलंकारापेक्षा प्रामाणिकपणाला प्राधान्य, असे पदर ‘भावतरंग’ मध्ये उलगडय़ात आले आहेत. त्यामुळे भाषेचे सच्चेपण आणि अर्थशास्त्रातील नेटकेपणा काय असते ते या काव्यसंग्रहातून अनुभवण्यास मिळते, असे डॉ. मृदुला दाढे म्हणाल्या. ‘भावतरंग’मधील कवितेत बहुआयामीपण आहे.

अचूक शब्द, तरल मन, सकारात्मक दृष्टिकोन यांचा संगम पाहण्यास मिळतो. मानवी जीवनातील नातेसंबंध विविध दृष्टिकोनातून मांडणारी ही कविता दैनंदिन जीवनाला वेगळ्या मार्गावर नेते, असे मुग्धा घैसास यांनी सांगितले. ‘येत्या काळात आपली ललित आणि अर्थ विषयाशी पुस्तके प्रकाशित होणार आहेत. तसेच, येत्या जुलैपासून आपली ‘स्वराज्य’ व्याख्यानमाला सुरू होणार आहे,’ असे टिळक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:49 am

Web Title: poetry collection published in dombivali
टॅग : Dombivali
Next Stories
1 यशाचा मार्ग गवसला
2 ‘स्मार्ट सिटी’त शौचालयांची वानवा
3 धोकादायक इमारतींचे पाडकाम
Just Now!
X