News Flash

डोंबिवलीत बनावट कॉल सेंटरवर छापा

सेंटरमधून दिनेश मनोहर चिंचकर (३१, रामदासवाडी, कल्याण), रोहित पांडुरंग शेरकर (२८, काकाचा ढाब्याजवळ, कल्याण पूर्व) या दोघांना पकडण्यात आले.

कर्ज देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक

डोंबिवली : येथील एमआयडीसीतील सीटी मॉलच्या पहिल्या माळ्यावर एका बनावट कॉल सेंटरवर नांदेड पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे धाड टाकली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घातला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २६ मोबाइल, लॅपटॉप, मोबाइल क्रमांकांची माहिती, असे एक लाखाहून अधिक रकमेचे साहित्य जप्त केले.

या सेंटरमधून दिनेश मनोहर चिंचकर (३१, रामदासवाडी, कल्याण), रोहित पांडुरंग शेरकर (२८, काकाचा ढाब्याजवळ, कल्याण पूर्व) या दोघांना पकडण्यात आले. इतर २० जणांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. हे कॉल सेंटर उत्तर प्रदेशमधील काही संगणकतज्ज्ञ मंडळी आणि इतर २० जणांकडून चालविले जात होते. ही टोळी नागरिकांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्याद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक करीत होते. या कॉल सेंटरमधून नांदेडमधील नागरिकांशी संपर्क साधून त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांना अगाऊ पैसे भरण्यास सांगितले होते. नागरिकांनी पैसे भरल्यानंतर कॉल सेंटरमधून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी  इतवारा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. नांदेड सायबर विभागाच्या उपनिरीक्षक अनिता चव्हाण यांनी फसवणूक झालेल्या तक्रारदारांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. ते फोन डोंबिवलीतून आल्याचे निदर्शनास आले. चव्हाण यांनी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्याआधारे त्यांनी डोंबिवलीतील सीटी मॉलमधील कॉल सेंटरवर पाळत ठेवली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉन आणि त्यांच्या पथकाने केंद्रावर पुन्हा पाळत ठेवली. या सेंटरमधून नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर धाड टाकून कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 3:25 am

Web Title: raid on fake call center in dombivli ssh 93
Next Stories
1 अर्थचक्राला पुन्हा गती
2 माळशेज घाटात दरड कोसळली
3 ठाणे जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये शून्य करोनामृत्यू
Just Now!
X