उल्हासनगरमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सलग चार महिने बलात्कार घडल्याची घटना उघडकीस आली आहे.
बलात्काराची फिर्याद देणाऱ्या महिलेस बलात्कार करणाऱ्या आरोपीने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करत तिचे प्रथम अश्लील फोटो काढले व हे फोटो प्रसारित करण्याची धमकी देत त्या महिलेवर या पुरुषाने मार्च ते जुलै २०१५ असे सलग चार महिने बलात्कार केला.
या वेळी लग्नाचे आमिष या पुरुषाने त्या महिलेला दाखवले, मात्र लग्न न केल्याने फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यावर या त्रस्त महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2015 6:13 am