ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात शुक्रवारी सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने अब्दुल वहाब गुलरेझ अहमद (१४) हा जखमी झाला. त्याच्यावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमृतनगर येथे आयेश ही पाच मजली २० वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील एका सदनिकेत अब्दुल वहाब गुलरेझ अहमद हा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. शुक्रवारी सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले. त्यात अब्दुलच्या छातीला, डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अब्दुल याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2023 रोजी प्रकाशित
मुंब्र्यात प्लास्टर कोसळून मुलगा जखमी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-11-2023 at 22:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 year old boy injured after ceiling plaster collapse in mumbra zws