ठाणे: जादा परताव्याचे आमीष दाखवून १५० गुंतवणूकदारांची ४१ कोटी २४ लाख ३० हजार ७८७ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात ‘ए.एस. ॲग्री ॲंड ॲक्वा एल.एल.पी.’ या कंपनीचा अध्यक्ष प्रशांत झाडे (४७) याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यापूर्वी पोलिसांनी गुन्ह्यातील संदीप सामंत (५५) आणि संदेश खामकर (४८) यांनाही अटक केली होती. या कंपनीत फसवणूक झाली असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

घोडबंदर येथे ए.एस. ॲग्री ॲंड ॲक्वा एल.एल.पी. नावाची कंपनी प्रशांत आणि त्याच्या साथिदारांनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून हळदीच्या उत्पादनापासून कुरकुमीन नावाचे पदार्थ तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पात १ कोटी रुपये गुंतवणूक केल्यास १६ महिन्यांनी एक कोटी आणि त्यानंतर पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये मोबदला मिळेल असे कंंपनीकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे देशातील विविध भागातून अनेकांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली होती. पंरतु यात गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळत नव्हता. या प्रकरणात ४ मार्चला आंंध्रप्रदेश येथे राहणाऱ्या एका महिलेने फसणूकीची तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा… ठाणे : राष्ट्रवादीचे २० माजी नगरसेवक शरद पवार यांच्या बैठकीस हजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. १६ मार्चला पोलिसांनी कंपनीच्या संबंधित संदीप आणि संदेश या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यावेळी १५० जणांची ४१ कोटी २४ लाख ३० हजार ७८७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तर कंपनीचा अध्यक्ष प्रशांत झाडे याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. नुकतेच पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.