कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला अर्धवेळ नोकरीचे आमीष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून चार भामट्यांनी २४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम उकळून फसवणूक केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ज्येष्ठ नागरिकाला तुम्हाला घर बसल्या सटोडिया व्यवहारातून अधिकाधिक फायदा करुन देतो असेही आमीष या भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला दिले होते. जुलै पासून भामटे ज्येष्ठ नागरिकाच्या व्हाॅट्सप माध्यमातून संपर्कात होते. याहूएलएस.ईन, टी.मी. कोक०७६४ या जुळणी ज्येष्ठ नागरिकाला पाठवून त्या माध्यमातून ते निवृत्ताची फसवणूक करत होते.

हेही वाचा >>>ठाणे:डिलीव्हरी बाॅय असल्याचे भासवून लुटले

प्रियब्रत बलराम राऊळ (६३, रा. गुरू आत्मन सोसायटी, गौरीपाडा, कल्याण पश्चिम) असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या जुलैपासून चार अज्ञात इसम प्रियब्रत राऊळ यांच्या ऑनलाईन माध्यमातून संपर्कात आले होते. ते राऊळ यांच्याशी व्हाॅट्सच्या माध्यमातून बोलत असायचे. आपण सेवानिवृत्त आहोत. आपणास कोठे अर्धवेळ काम मिळेल का असा विचार राऊळ यांनी भामट्यांजवळ बोलून दाखविला. राऊळ यांचा विश्वास संपादन करुन ते त्यांच्याशी संवाद साधत होते. आमच्याकडे अर्धवेळ कामा बरोबर ऑनलाईन सटोडिया व्यवहार करुन आम्ही तुम्हाला दामदुप्पट पैसे कमवून देतो असे आश्वासन भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला दिले.या बोलण्यावर विश्वास ठेऊन प्रियब्रत राऊत यांनी भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे विविध टप्प्यामध्ये एकूण २४ लाख ३० हजार रुपये आपल्या बँक खात्यांमधून ऑनलाईन प्रणालीतून भामट्यांच्या खात्यावर वर्ग केले. समोरील इसम आपली फसवणूक करत आहेत याची थोडीही कुणकुण राऊळ यांना लागली नाही.

हेही वाचा >>>कल्याणमधील नौदल संग्रहालयामुळे शिवाजी महाराजांच्या काळाला उजाळा; सेवानिवृत्त उप नौसेनाप्रमुख एस. व्ही. भोकरे यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण रक्कम भरणा केल्यानंतर राऊळ यांनी भामट्यांकडे वाढीव मोबदला आपल्याला देण्यास सांगण्यास सुरुवात केली. भामटे वेळकाढूपणा करुन उडवाउडवीची उत्तरे राऊळ यांना देऊ लागले. पाच महिन्यात भामट्यांनी आकर्षक परतव्याचा एक पैसाही परत केला नाही. त्यानंतर त्यांनी आपले मोबाईल फोन बंद केले. दिलेल्या जुळणीवर संपर्क केला तर ती बंद येऊ लागली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर राऊळ यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे.