लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मुंबई नागरी सुविधा पायाभूत सुविधा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ५० कोटीची काँक्रीटीकरणाची रस्ते कामे हाती घेतली आहेत. कल्याण परिसरात होणाऱ्या या कामांसाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने ना हरकत दिली आहे. या रस्त्यांसंदर्भातच्या तक्रारी आणि देखभाल ही पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असेल या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी रस्ते बांधकामासाठी ना हरकत दिली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
work of rebuilding the skyway outside Bandra railway station remains on paper even after a year
वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील आकाशमार्गिका पुनर्बांधणीचे काम वर्ष उलटूनही कागदावरच

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विस्तारित मुंबई नागरी सुविधा पायाभूत सुविधा अंतर्गत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे बाराशे कोटीची रस्ते कामे सुरू आहेत. याच रस्ते प्रकल्पांचा एक भाग सार्वजनिक बांधकाम विभागाने कल्याण शहरालगतची भागातील अंतर्गत रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहेत. या रस्ते कामांसाठी पालिकेची ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. या रस्त्यांची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल या अटीवर आयुक्त डॉ. जाखड यांनी ही ना हरकत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत उच्चभ्रू वस्तीत मसाज केंद्राच्या नावाने वेश्या व्यवसाय

पालिका हद्दीत असुनही अनेक वर्ष बांधणी न केलेले खराब रस्ते या कामांमुळे सुस्थितीत होणार आहेत. डोंबिवलीचे आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या खात्याचे मंत्री असल्याने बांधकाम विभागाने गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत डोंबिवलीतील काँक्रीट रस्ते कामे पूर्ण केले आहेत. कल्याण परिसरातील बहुतांशी रस्ते सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारितील असल्याने पालिका त्या ठिकाणी काम करत नव्हती. त्यामुळे नागरिकांना खराब रस्त्यावरून जावे लागत होते. अलीकडे कल्याण, डोंबिवली परिसरातील आमदारांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक हजार १५६ कोटीचा निधी रस्ते कामांसाठी दिला आहे.

सुरू होणारी रस्ते कामे

उंबर्डे येथील भरत भोईर यांचे घर ते जुनी मराठी शाळा, अटाळी हनुमान मंदिर ते नारायण पाटील घर, गांधारी रॉयस गॅलेक्सी ते महावीर हेवन, चंद्रेक्स गॅलेक्सी ते गांधारी मुख्य रस्ता, अष्टविनायक ते चंद्रेक्स गॅलेक्सी, ओम रेसिडेन्सी ते रौनक सिटी, रामदासवाडी मस्जिद गल्ली पर्यंत, अहिल्याबाई चौक ते सहजानंद चौक, शहाड अंबर हॉटेल ते गणेश कोट कार्यालय, शहाड हनुमान मंदिर ते अशोक ढोणे घरापर्यंत, मोहने अग्निशमन केंद्र ते शॉपिंग कॉम्पलेक्स दोन्ही भाग, काळा तलाव आदेश्वर चौक ते विकास हाईट्स, पत्रीपूल नाला ते सर्वोदय सागर सोसायटी पर्यंत.