लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा प्रकार ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात नवी मुंबईतील उलवे येथील मसाज केंद्र चालविणाऱ्या महिले विरुध्द पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Panvel, sheva village, Air Force Station, Suspicious Individual, Arrests, Trespassing, Roaming, Restricted Area, marathi news
हवाई दलाच्या प्रवेश निषिद्ध परिसरात प्रवेश केल्याने गुन्हा दाखल

जयश्री प्रमोद मुंढे असे मसाज केंद्र चालविणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे. ती शंखेश्वर गृह संकुलातील सदनिका क्रमांक सहा, पहिल्या माळ्यावर संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा नावाने मसाज केंद्र चालवित होती. या केंद्रातून दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. या महिला घरची आर्थिक बेताची परिस्थिती आणि उपजीविकेचा विचार करून या अनैतिक व्यवसायात उतरल्या होत्या, असे पोलीस तपासात उघडकीला आले.

आणखी वाचा-एमएमआर’मध्ये सुसज्ज आरोग्य सुविधा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; कर्करोग रुग्णालय, सूतिकागृहाचे भूमिपूजन

ठाणे येथील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना शुक्रवारी एका अनोळखी व्यक्तिने संपर्क साधला. डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलाच्या एका सदनिकेत मसाज केंद्राच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविला जात आहे, अशी माहिती दिली. संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा शॉप नावाने हे केंद्र चालविले जात होते. या केंद्रात मसाजसाठी एक हजार रूपये आणि शरीरसुखासाठी एक हजार पाचशे रुपये वाढीव आकारले जात होते. दोन हजार पाचशे रुपयांचा भरणा मसाज केंद्रात केला की या केंद्रातील चालिका ग्राहकाच्या आवडीप्रमाणे त्याला पीडित महिला उपलब्ध करून देत होती.

आणखी वाचा-कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ

या अनैतिक व्यवसायाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वालगुडे आणि त्यांचे पथक डोंबिवलीत संस्कृती मसाज केंद्रावर छापा टाकण्यासाठी दाखल झाले. त्यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ममता मुंजाळ यांचे सहकार्य मिळाले. मसाज केंद्रात अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून तेथे खरच अनैतिक व्यवसाय चालतो का याची खात्री केली. बनावट ग्राहक पोलिसांनी खुणा करून दिलेले पैसे घेऊन केंद्रात गेला. केंद्रात जाताच त्याच्याकडून दोन हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्याच्या मागणीप्रमाणे शरीरसुखासाठी एक महिला त्याला उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या सूचनेप्रमाणे बनावट ग्राहकाने खोलीतून पोलिसांना मोबाईलवर संपर्क करून इशारा करताच वरिष्ठ अधिकारी चेतना चौधरी, ममता मुंजाळ आणि कारवाई पथक संस्कृती मसाज केंद्रात दाखल झाले. त्यावेळी तेथे दोन पीडित महिला आढळून आल्या. एक डोंबिवलीतील आयरेगाव, एक मुंबईतील ॲन्टॉप हिल भागातील होती. या महिला ३५ ते ३८ वयोगाटीतल आहेत. कारवाईच्या ठिकाणी सात हजार, इतर साधने आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली.

मसाज केंद्र चालकाने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याने पोलिसांनी मसाज केंद्र चालक जयश्री मुंढे हिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील मसाज केंद्रांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.