कल्याण येथे ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कल्याण पोलिसांनी जुन्नर येथून अटक केली.
पिडीत महिला कांबा येथील पाचवा मैल भागातून सोमवारी रात्री जात होती. त्यावेळी आरोपीने तिला निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक या गुन्ह्य़ाचा तपास करत होते. या पथकाने या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपीची ओळख पटविली. आरोपी कल्याण येथील पाच मैल भागातच राहत होता. मात्र, तो जुन्नरला पळून गेला होता. पोलिसांनी जुन्नरमधील आळेफाटा येथून त्याला अटक केली. त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.