डोंबिवलीजवळ ५६ लाखांचा दरोडा

दरोडेखोरांनी लुटीसाठी वापरलेले स्कॉर्पिओ वाहन पोलिसांनी दिवा रेल्वे स्थानक परिसरातून हस्तगत केले आहे.

डोंबिवलीजवळील निळजे रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सीएमएस कंपनीच्या वाहनातून नेली जाणारी ५६ लाख रुपयांची रोख रक्कम सहा दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हरचा धाक देऊन लुटली.

दरोडेखोरांनी लुटीसाठी वापरलेले स्कॉर्पिओ वाहन पोलिसांनी दिवा रेल्वे स्थानक परिसरातून हस्तगत केले आहे. सीएमएस कंपनीची व्हॅन ५६ लाखांची रोख रक्कम घेऊन निळजे रेल्वे स्थानकाजवळील एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जात होती. या वाहनात चालक, एक बंदूकधारी व कर्मचारी होते. त्याच वेळी निळजे रेल्वे स्थानकाजवळ एक तास अगोदर दबा धरून बसलेले सहा दरोडेखोर व्हॅनला आडवे गेले. सीएमएसच्या बंदूकधारी रक्षकांवर रिव्हॉल्व्हर रोखून वाहनातील ५६ लाख लुटून ते पसार झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 56 lakh robbery in dombivali