ठाणे : ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रविवारी ठाणे ते कळवा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. रविवारी रेल्वे प्रशासनाने ठाणे खाडीवर बसविलेल्या दोन नव्या लोखंडी तुळईवरील रेल्वे रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर इंजिन चालविले. हा प्रयोगही यशस्वी झालेला आहे. त्यामुळे सोमवारपासून खाडीवरील नव्या रेल्वे रुळावरून धिम्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुरू होणार आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ठाणे आणि कळवा येथील तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या कामासाठी रेल्वेचे ८०० अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मेगाब्लॉक दरम्यान ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या आणि नव्या रुळांची जोडणी करण्यात आली. तसेच काही तांत्रिक दुरुस्ती केली गेली. ठाणे स्थानकापुढे उपनगरीय रेल्वेची वाहतूक ही ठाणे खाडीवरून कळव्याच्या दिशेने जाते. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने ठाणे खाडीवर जुन्या रेल्वे रुळांलगत दोन लोखंडी तुळई तयार करून नवी रेल्वे मार्गिका तयार केली होती. रविवारी रेल्वेने या लोखंडी तुळईवरील रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर दोन इंजिन चालविले. हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे सोमवारपासून या नव्या रेल्वे रुळावरून धिम्या मार्गिकेची वाहतूक सुरू होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2022 रोजी प्रकाशित
रेल्वे वाहतुकीला आजपासून सुरूवात ; ठाणे खाडीवरील नव्या मार्गिकेचे काम पूर्ण
रविवारी रेल्वेने या लोखंडी तुळईवरील रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर दोन इंजिन चालविले. हा प्रयोग यशस्वी झाला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-01-2022 at 01:51 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5th and 6th lines work between thane to kalwa railway stations complete zws