कल्याण – पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये राहत असलेल्या व्यावसायिकाने पत्नीसह सात वर्षीय मुलाची हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.  या हत्येनंतर व्यावसायिक फरार झाला असून त्याने उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.अश्विनी गायकवाड (२७), आदिराज गायकवाड (७)  अशी हत्या झालेल्या मायलेकाची नावे आहेत. दीपक गायकवाड असे फरारी व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आर्थिक विवंचनेतून किंवा घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दीपक गायकवाड हा पत्नी अश्विनी, मुलगा आदिराज यांच्यासह कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील ओम दीपालय सोसायटीत राहतो. शुक्रवारी सायंकाळी त्याने घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतून पत्नी, मुलाच्या तोंडावर उशी ठेऊन त्यांची हत्या केली. या घटनेनंतर दीपकने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून पळून गेला.

हेही वाचा >>>..म्हणून शरद पवार यांना बाजूला करायचे होते, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक गेल्या सहा वर्षापासून एक वित्तीय कंपनी चालवितो.  दीपकने कार्यालयातील आकाश सुरवाडे या कर्मचाऱ्याला दुपारी दीड वाजता संपर्क करून पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचे सांगितले. तसेच तू घरी जाऊन ये. मी पण आता आत्महत्या करत आहे, असा निरोप दिला. आकाश तातडीने दीपक यांच्या घरी पोहचला. तेथे दरवाजाला कुलूप होते. त्याने तात्काळ दीपक, अश्विनी यांच्या नातेवाईकांना संपर्क केला. त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कुटुंबीयांनी घरात प्रवेश केला. तेव्हा अश्विनी, आदिराज यांचे मृतदेह बिछान्यावर, जमिनीवर पडले होते. त्यांनी ही माहिती देताच पोलिस घटनास्थळी आले. दीपकने आपण आत्महत्या करत असल्याचा निरोप दिल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा मोबाईल बंद येत आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याची पथके त्याचा शोध घेत आहेत.  दीपकने पत्नी, मुलाची हत्या केल्याचे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले.