scorecardresearch

धक्कादायक! रिक्षात बसल्याने कुत्र्याच्या पिलाला बेदम मारहाण, मारहाणीत पिलाचा दुर्दैवी मृत्यू; रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

रिक्षाचालक धर्मा कुंठे याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ulhasnagar, Crime, Puppy,
रिक्षाचालक धर्मा कुंठे याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रिक्षात येऊन बसत असल्याने उल्हासनगरात एका रिक्षाचालकाने कुत्र्याच्या लहान पिलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या मारहाणीत या मादी पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक धर्मा कुंठे याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर प्राणीप्रेमींमधून संपात व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षात पाळीव प्राण्यांना बेदम मारहाण करत त्यांना ठार करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र प्राणीप्रेमींच्या सतर्कतेमुळे अशा विकृत व्यक्तींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कुत्र्याला मारहाण करून झाडाला टांगून जीवे ठार केले होते. तर अशाच एका प्रकारात गाडीखाली कुत्र्याला चिरडण्यात आले होते. क्षुल्लक कारणावरून कुत्र्यांचा जीव घेण्याचा हा प्रकार होता. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात एका उभ्या असलेल्या रिक्षामध्ये कुत्र्याचे पिल्लू बसत असल्याचा राग आल्याने रिक्षा चालक धर्मा कुंठे याने रागाच्या भरात त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुत्र्याचे पिल्लू गंभीर जखमी झाले. यातच या पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच राज चोटवाणी यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी धर्मा कुंठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A puppy dies after rickshaw driver attack him with stick in ulhasnagar sgy